Tuesday, 5 December 2017

आय.बी.टी. गृह आरोग्य विभाग



   विद्यार्थांनी बनवली खमंग शंकरपाळी
 

गृह  व आरोग्य या विभागांतर्गत इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी खमंग अशी शंकरपाळी बनवली. तसेच त्याची packing करून ती विद्यालयाच्या  विद्यार्थ्यांना माफक दरात विक्री केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना  वस्तूचे मूल्य काढणे व स्वयंरोजगार कसा मिळवता येईल याची माहिती मिळाली

भाजी वाळवण्यासाठी ड्रायर तयार केला 
 

ड्रायर हा मुलांनी तयार केला . ड्रायर  मुळे भाजी वाळवून ती आपण जास्त काळ टिकून ठेवू शकतो. ती आपण कधीही बनवून खाऊ शकतो. ड्रायर तयार करताना वेल्डिंग मशीन , कटिंग मशीन , grander, square tube चा वापर करून ड्रायर बनवला. ३-५/४-५ या मापाचा ड्रायर बनवला .ड्रायरला  नेट  लावून शिउन घेतले. या ड्रायर वर अनेक प्रकारच्या भाज्या वाळवता  येतात. ड्रायर बनवताना एप्रोंन्स,हंड्ग्लोव्ज व वेल्डिंग चष्मा घालावा लागतो , नाहीतर वेल्डिंग लागते हे लक्षात आले . २०० मायक्रोनचा प्लास्टिक कागद वापरला . अल्युमिनिअमची जाळी  लावली. ३ किलो भाजी ड्रायर मध्ये ठेवल्यास १०० gram dry भाजी तयार होते.
 

No comments:

Post a Comment