आमची शाळा

 







ज्ञानदा शिक्षण मंडळ संचालित , ' कन्या प्रशाला '

 १९९० च दशक , त्या काळात मुलींच्या शिक्षणाबद्दल खेडेगावामध्ये  बरीचशी अनास्था दिसत होती. सर्व स्तरावरील मुलीना शिक्षण मिळावे हा उद्देश समोर ठेऊन ज्ञानदा शिक्षण मंडळाची स्थापना झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मा. आमदार. श्री वल्लभ शेठ बेनके हे आहेत व या मंडळामार्फत सन १९९२ साली कन्या प्रशाला नारायणगाव कुकडी कॉलोनी या शाळेची सुरुवात झाली.मा. श्री बेनके साहेबांचे मार्गदर्शन व  संस्थेचे सचिव  श्री डी. डी. डोके, सहसचिव स्व. श्री बाळासाहेब साने , सदस्य श्री. ए.आर. ब्रम्हे यांच्या  प्रयत्नांमुळे आज संस्था नावारूपाला आली आहे.
या संस्थेच्या  एकूण शाळा  आहेत.

 
यापैकी आमची शाळा ज्ञानदा विद्यामंदिर, नारायणगाव ही एक आहे .
सध्याचे ज्ञानदा शिक्षण मंडळाचे सचिव  मा. श्री. अमित वल्लभ बेनके हे आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते
चालू शैक्षणिक वर्षात शाळेचा एकूण पट ३०० असून मुलांची संख्या 138 व मुलींची  संख्या 162  आहे. इयत्ता 5 वी ते इयत्ता  10 वी चे विद्याथी शिक्षण घेतात. सध्या विद्यालयात कार्यरत शिक्षक संख्या 10 असून शिक्षकेतर कर्मचारी 5 आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. नीलम एम. येवले ह्या आहेत.



 
       शाळा व्यवस्थापन कमिटी       -             

1) श्री. अमित वल्लभ बेनके
अध्यक्ष
2)  सौ. उज्ज्वला लीलाराम
उपाध्यक्ष
3) सौ. येवले नीलम मुरलीधर
सचिव
4) सौ. नाईक भारती रंगनाथ
सदस्य
5) सौ. पोखरकर एस.आय.
सदस्य
6) सौ. शिंगोटे जे. आर.
सदस्य
7) सौ. मणेर नजमा रमजान
सदस्य
8) सौ. कुरेशी फिरदोस खलील
सदस्य
9) सौ. जगदाळे सविता सोमनाथ
सदस्य
10) सौ. वायकर सविता आनंद
सदस्य
11) सौ. खुडे सरोज गणेश
सदस्य
12) श्री. नेहरकर अनिल विष्णू
सदस्य
13) श्री. सोनवणे रमेश सुदाम
सदस्य
14) श्री. खिल्लारे संजय माणिकराव
सदस्य
15) श्री. शेळके आनंद गंगाराम
सदस्य
16) श्री. मोटे बाळासो राणू
सदस्य
17) श्री. कसबे लुकास आनंदा
सदस्य
18) कु. मणेर अलिशान रमजान
सदस्य
19) कु. डेरे दिपाली राजेंद्र
सदस्य


शिक्षक व इतर कर्मचारीवर्ग यादी

सौ. येवले नीलम मुरलीधर
मुख्याध्यापिका
सौ. पोखरकर एस.आय.
शिक्षक
सौ. शिंगोटे जे. आर
शिक्षक
सौ. सोनवणे एस.ए
शिक्षक
सौ. गायकवाड सी. एल.
शिक्षक
सौ. इंगळे बी. जी
शिक्षक
सौ. पाचोरे जे. एस.
शिक्षक
श्रीम. अंधारे ए.एल.
शिक्षक
सौ. डुंबरे एम. बी.
शिक्षक
श्री. थोरात प. आर.
शिक्षक
सौ. साने एस. एस.
प्र. परिचर
श्री. घोडे गी. वव्ही.
शिपाई
श्री. कसबे एल. ए.
नाईक
 





 शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ चा शुभारंभ
१५ जुन २०१७ 

  • सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि कॅडबरी देऊन स्वागत


  • S.S.A अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप




वृक्षारोपण मोहीम

जागतिक स्तरावर उष्णतेत सातत्याने होत असलेली वाढ, हवामान व ऋतूबद्दल, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच दुर्भिक्ष यावर मात करण्यासाठी व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. ही बाब जागतिकस्तरावर मान्य झाली आहे. वातावरणी कॉर्बनडाय आॅक्साईड शोषून नैसर्गिक प्रक्रियेने आॅक्सीजन उत्पन्न करणारे एकमेव यंत्र म्हणजे वृक्ष तथापि असंतुलीत विकासासाठी निर्वणीकरण व वृक्षतोडीमुळे वृक्षाच्छादनाचे प्रमाण कमीहोत चाललेले आहे. यासाठी भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने १ जुलै २०१७ ते ७ जुलै २०१७या सप्ताहात राज्यभर वृक्ष लागवड योजना कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी ७६ वृक्ष लागवड केली.



 

⧫  राज्य मतदार दिवस  ⧫

 दिनांक ५ जुलै २०१७ रोजी शाळेमध्ये राज्य मतदार दिन साजरा करण्यात आला. मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतूने दरवर्षी राज्यस्तरावर व प्रत्येक जिल्ह्यात " राज्य मतदार दिन " साजरा करण्यात आला.
     

 

 ⧭  गुरुपौर्णिमा  ⧭

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll


   

 

 दिनांक  १० जुलै २०१७ रोजी  शाळेच्या विद्यार्थ्यांनी  'गुरुपौणिमा' साजरी केली.






' रोटरी '

समाजोपयोगी मानवतावादी सेवा देणारी संघटना
रोटरी क्लब नारायणगावने शाळेला वेळोवेळी मदतीचा हात दिलेला आहे. फर्निचर , water purifier, इ- लर्निंग संच, रोख देणगी रक्कम या स्वरुपात मदत केलेली आहे. 
रोटरी क्लब ने १३ जुलै २०१७ रोजी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेश व वह्या देण्यात  आल्या. या कार्यक्रमासाठी नारायणगावातील रोटरी क्लब चे सर्व  रोटेरियन  उपस्थित होते.


  15 ऑगस्ट 2017 - 71वा स्वातंत्र्यदिन 


प्रत्येक स्वातंत्र्यदिनी s.s.c. परीक्षेत विशेष नैपुण्य  प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेमार्फत आयोजित केला जातो या वर्षी मार्च 2017 परीक्षेमध्ये प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले , तसेच इयत्ता 5वी ते 9वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना  सन्माननीय  अतुल सर बेनके  उपाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस व नान्नोर साहेब  मुख्य कार्यकारी अभियंता  कुकडी पाटबंधारे विभाग  यांचे हस्ते बक्षीस व ट्रॉफी देवून  गौरविण्यात आले 
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सन्माननीय अमितसर  बेनके , सन्माननीय डोके साहेब,  सन्माननीय ब्राह्मेकाका ,सन्माननीय राजश्रीताई बेनके , सन्माननीय पल्लवीताई बेनके ,सन्माननीय लम्बेसाहेब, सन्माननीय डॉक्टर काचळे,  डॉक्टर अमेय डोके  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.








No comments:

Post a Comment