शेती व पशुपालन विभाग
ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे,इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मेथी बियाण्यास Metalaxyl chi बीजप्रक्रिया केली.
बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यांतून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आणि जोमदार रोप येण्यासाठी बियाण्यांवर वेळोवेळी जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया केली जाते.याला बीज प्रक्रिया म्हणतात.
बीज प्रक्रियेचे फायदे-
1)बीज प्रक्रियेमुळे बियांची उगवण क्षमता वाढवता येते.
2)उत्पादनात वाढ होते.
3) रोपे मारण्याचे प्रमाण कमी होते.
4) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते .
5)रोपे निरोगी व जोमदार वाढतात .
6)बीज प्रक्रियेमुळे जमिनीतून व बियांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.