Thursday, 22 May 2025

शेती व पशुपालन विभाग

  

              सीड बॉल तयार करणे

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी सीड बॉल तयार केले त्यासाठी माती व शेण 2:1 या प्रमाणात घेऊन त्यामध्ये निंबोळी चुरा थोडा टाकला व पाणी टाकून मातीचा घट्ट गोळा होईल असे मिक्स करून घेतले. त्या चिखलाचे छोट्या आकाराचे बॉल तयार करून काही बॉल मध्ये दोन दोन  चिंच चे बी व  काही बोलमध्ये दोन दोन गुलमोहराचे बियाणे टाकून सीड बॉल तयार केले. विद्यार्थ्यांनी 50 सीड बॉल तयार केले. 

सीडबॉलसाठी काळी माती वापरल्यास बीज अंकुरण्यास व योग्य आद्रता टिकून ठेवण्यास मदत होते व निंबोळी पावडर मुळे कीटक व रोगांपासून संरक्षण होते. 

सीड बॉल चे फायदे :  

1. बियाण्यांचे संरक्षण होते.

2. सीड बॉल मुळे बियाणे पक्षी व प्राण्यांकडून खाल्ले जात नाहीत. 

3. बियाणे उडून जाण्यापासून संरक्षण होते. 

4. माती व कंपोस्ट मध्ये बियाणे गुंडाळल्याने बियाण्याची उगवण क्षमता वाढते.

5. सीड बॉल सहजपणे फेकून किंवा गाडून लागवड करता येते.