Tuesday, 16 May 2023

समर कॅम्प

 

              थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज  पुण्यतिथी 

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव , येथे सहा मे रोजी थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांची100  वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली व त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022 -2023 चा निकाल देण्यात आला.












                                             समर कॅम्प

ज्ञानदा विद्या मंदिर येथे 8  मे 2023  ते 13 मे 2023 दरम्यान सकाळी आठ ते दहा या वेळात समर कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवण्यात आल्या त्यामध्ये 1) पहिल्या दिवशी अग्निशामक नळकांडे वापरून आग कशी विजवली जाते. तसेच जुन्या बांगड्यांना रेशीमचा रंगीत धागा वापरून बांगडी नवी कशी बनवली जाते हे शिकवले.2) दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना पिझ्झा बनवायला शिकवले .3)तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पुठ्ठा , सेल, फॅन यांचा वापर करून कुलर बनवायला शिकवले . 4) चौथ्या दिवशी उंदीर पकडण्याचा सापळा बनवायला शिकवले. 5) पाचव्या दिवशी फोटो पासून रिल्स बनवायला शिकवले तसेच त्याला गाणी टाकणे इफेक्ट देणे व्हिडिओला गाणे बदलने हे शिकवले .6) सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांना  इंजेक्शन चा वापर करून हायड्रोलिक क्रेन बनवायला शिकवले व  विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन समर कॅम्प ची सांगता केली.