गृह आरोग्य विभाग
इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी सोलर ड्रायर वर भेंडी व टोमॅटो ड्राय केले. भाज्या व इतर गोष्टी कोणत्याही रसायनांचा वापर न करता वाळवल्यामुळे
आरोग्यावर घातक परिणाम होण्याचा जराही धोका नसतो. वर्षभर आपल्याला आपल्या आवडत्या भाज्या खाता
येऊ शकतात.
भाज्या वाळवण्याची कृती अगदी सोप्पी आहे.
आपल्याला ज्या भाज्या किंवा फळं
वाळवायची असतील त्या कापून धुवून ट्रेवर पसरवायच्या. नंतर तो ट्रे बंद
करून टाकायचा. संध्याकाळपर्यंत भाज्या वाळतात. मग त्या डब्यात भरून
ठेवायच्या. ज्यावेळी आपल्याला भाज्या वापरायच्या असतील तेव्हा डब्यातल्या भाज्या
काढायच्या आणि फोडणीला टाकायच्या.
उदा : आमटी करताना कांदा, टोमॅटो
घालायचे असतील तर या वाळवलेल्या फोडी वरणात टाकल्या की, त्या मस्त फुलून
येतात, कोणाला समजणारसुद्धा नाही इतक्या ताज्या वाटतात. सोलर ड्रायर या उपकरणाद्वारे फळं-भाज्यांची नासाडी सामान्यातली सामान्य व्यक्तीही वाचवू शकते.
उर्जा व पर्यावरण विभाग
उर्जा व पर्यावरण विभागात विद्यार्थ्यांनी मिक्सर मोटार दुरुस्ती केली व विद्यार्थ्यांना फॅन मोटार फिटिंग कशी करायची ते शिकवले.
आय.बी.टी. शेती पशुपालन विभाग
आय.बी.टी. शेती पशुपालन विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी दशपर्णी अर्क तयार करून तो विक्री साठी ठेवला आहे.
आय.बी.टी. अभियांत्रिकी विभाग
आय.बी.टी मधील अभियांत्रिकी विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी डिश टीवी फिटिंग करण्यासाठी स्टूल बनवला.
गृह आरोग्य विभाग
इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी केली.
इयत्ता आठवीचे विद्यार्थी तिखट शंकरपाळी व नान कटाई तयार करताना