Friday, 19 January 2018

अतिथी व्याख्यान

दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजी विद्यालयात डॉ. रश्मी घोलप मॅडम यांचे अतिथी व्याख्यान घेण्यात आले. या व्याख्यानाचा विषय किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन असा होता.  डॉ. रश्मी घोलप मॅडम यांनी शालेय विद्यार्थिनींना शारीरिक आरोग्यविषयी  माहिती, तसेच आरोग्यविषयीच्या समस्या व उपाय, दैनंदिन जीवनातील पोषक आहार कोणता घ्यावा इ. विषयी मार्गदर्शन केले. या व्याखानाला ज्ञानदा शिक्षण मंडळाचे मानद सचिव श्री डी.डी. डोके साहेब हे उपस्थित होते.




पुस्तक भेट

पुस्तक भेट

 ज्ञानदा शिक्षण मंडळाचे मा. सहसचिव स्व. साने बाबा यांच्या स्मरणार्थ साने आजींकडून विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी ग्रंथालयातील पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.


 

 

शैक्षणिक उपक्रम


 शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम


सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात दरवर्षी प्रमाणे  ज्ञानदा विद्यालयात शालेय अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये खेळाच्या स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, रांगोळी, मेहंदी, वक्तृत्व,गीतगायन, पाठांतर इ. विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्वच्छता अभियान, तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले.

गीतगायन

मेहंदी स्पर्धा


रांगोळी स्पर्धा

चित्रकला स्पर्धा



स्काऊट गाईड अंतर्गत खाद्यपदार्थ स्टाॅल

स्काऊट गाईड अंतर्गत खाद्यपदार्थ स्टाॅल

स्काऊट गाईड अंतर्गत आमच्या विद्यालयात खरी कमाई उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमा विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टाॅल बांधून शाळेसाठी खरी कमाई केली.

 

पावभाजी

मिसळ