Tuesday, 19 December 2017

Smart Girl प्रशिक्षण



Smart Girl  प्रशिक्षण









दिनांक १२/१२/२०१७  शाळेमध्ये युवती सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वी च्या  मुलीना Smart Girl प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्दिष्टे मुलींमधील आत्मजीवन  वृद्धिंगत करणे, नातेसंबंधाना जपण्याबाबत मानसिक तयारी करणे, आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाबाबत जागरुकता निर्माण करणे, धोकादायक प्रलोभानाची जाणीव ठेवून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे. इ. वर मुलीना माहिती देण्यात आली.
मुलींसाठी त्यांच्या भावनिक सबलीकरणासाठी आणि त्यांच्या सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी   ‘ Smart Girl ’ प्रशिक्षण घेण्यात आले.
 

आय.बी.टी. स्क्रॅप रॅली

आय.बी.टी. स्क्रॅप रॅली




नालंदा फौंडेशन आणि विज्ञान आश्रम पाबळ यांच्या सहकार्याने ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव या शाळेत आय.बी.टी. हा व्यावसायिक अभ्यासक्रम सन २०१६ पासून सुरु आहे. आय.बी.टी. अंतर्गत स्क्रॅप रॅली हा उपक्रम शनिवार दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी विद्यालयाने आयोजित केला होता. परिसरातून प्रभात फेरी काढून लोकांना आवाहन केले व परिसरातील लोकांनी घरातील टाकाऊ वस्तू उत्फूर्तपणे विद्यार्थ्यांना दिल्या. त्यात प्लास्टिक बॉटल, ड्रम, फॅन, तेल डबे, इ. सत्तर ते ऐंशी किलो साहित्य जमा केले.
विद्यार्थी या टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणार असून त्यातून नव निर्मितीचा आनंद घेणार आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होणार आहे. या उपक्रमाचे कौतुक शंभूवंश प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सत्कार करून केले.