Tuesday, 25 February 2025

शेती पशुपालन विभाग

सप्त धान्यांकुर संजीवक तयार करणे.


ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी पिकांची वाढ व फळांची वाढ चांगली होण्यासाठी व पिकांना संजीवक मिळण्यासाठी सत्ताधान्याकुर हे संजीवक तयार केले.

सप्तधाण्यांकुर संजीवक तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी  गहू उडीद मटकी मूग तीळ हरभरा चवळी या धान्याचे प्रत्येकी 100 ग्रॅम  बियाणे घेतले. व ते बियाणे  प्लास्टिकच्या कुंडीमध्ये 24 तासासाठी  बियाणे भिजतील एवढ्या पाण्यात भिजत ठेवले. 24 तासानंतर विद्यार्थ्यांनी ते बियाणे मिक्सरला बारीक केले व चाळणीतून वस्त्रगाळ करून ते द्रावण पिकावर फवारले. सप्तधाण्यांकुर तयार केल्यानंतर 48 तासाच्या आत पिकावर फवारणी करावी. 

 सप्तधाण्यांकुर फवारल्यामुळे पिकांची वाढ व फळांची वाढ चांगली होते तसेच पिकांना संजीवके मिळतात.