शेंगदाणे चिक्की
ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, शाळेतील इयत्ता नववीचे विद्यार्थ्यांनी शेंगदाणे चिक्की बनवली.
साहित्य- शेंगदाणे चिक्की साठी लागणारे साहित्य गुळ तूप व शेंगदाणे
कृती:- 1) शेंगदाणे भाजून घेणे.
2) भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून
घेणे.
3) गॅस वर कढईमध्ये गुळाचा पाक करायला ठेवणे
4) गुळाचा पाक तयार झाल्यावर त्यात
शेंगदाण्याचा कूट टाकून कमी आचेवर एकजीव
करून घेणे.
5) एकजीव झालेलं मिश्रण पोलपटावर काढून
घेणे व ते चपाती सारखे लाटणे व चौकोन
आकारात कट करणे थोडी थंड झाल्यावर
त्याची पॅकिंग करणे.
पद्धत:- पाक पद्धतीने अन्नपदार्थ बनवणे.
काय शिकले:- पाक पद्धत शिकले, चिक्की हा टिकणारा पदार्थ आहे, शेंगदाणे गुळ हे पौष्टिक पदार्थ आहे, चिक्की ची कॉस्टिंग कशी काढावी, तिचे पॅकिंग करून शाळेत विद्यार्थ्यांनी विक्री केली.