दशपर्णी अर्क तयार केला.
५० लीटर च्या प्लास्टिक बँरल मध्ये २५ लीटर पाणी घेतले त्यात ६२५ gm कडूनिंब पाला , २५० gm निरगुडी पाला, २५० gm घाणेरी पाला, २५० gm गुळवेल पाला, २५० gm मोगली एरंड पाला, २५० gm सीताफळ पाला, २५० gm पपईपाला, २५० gm, रुई पाला, २५० gm करंज पाला, २५० gm , कन्हेर पाला, २५० gm गाईचे ताजे शेण, ६२५ gm, गोमुत्र घेतले.
सर्व बँरल मध्ये टाकल्यानंतर बांबूच्या काठीने डावीकडून उजवीकडे ढवळले. अशाप्रकारे ३० दिवस द्रावण ढवळल्यानंतर दशपर्णी अर्क तयार होतो.
दशपर्णी अर्क वापरण्याचे प्रमाण - २.५ लीटर द्रावण २०० लीटर पाण्यात मिसळून फवारणे.
दशपर्णी अर्काची विक्री
इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी दशपर्णी अर्काची १० लिटर द्रावणाची विक्री केली प्रती १२ रु लिटर प्रमाणे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दशपर्णी अर्क खरेदी केला . दशपर्णी अर्क हे सेंद्रिय किट कनाशक आहे सर्व प्रकारच्या किडी प्रथामावास्तेतील अळ्याव ३८ प्रकारच्या बुरशी नियंत्रण दशपर्णी ने होते.
इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी रोपवाटीकेतील तयार केलेल्या रोपांची तण काढून व्यवस्थित मांडणी केली. व रोपांची विक्री केली
रोपाची नावे विक्री किंमत
गुलाब २० रुपये
जास्वंद २० रुपये
चिंच १० रुपये
करंज १० रुपये
शेवगा १० रुपये