आय.बी.टी. विभाग



IBT - Introduction to Basic Technology

 MSFC - Multi Skill foundation Course  
(मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख) 

विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचे काम विज्ञान आश्रम गेली ३१ वर्षाहून अधिक काळ करत आहे.'शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकासहे धेय्य डोळ्यासमोर ठेवून जानेवारी  १९८३ मध्ये डॉ.श्रीनाथ कलबाग यांनी विज्ञान आश्रम ची स्थापना केली.
             १४ मार्च २०१६ पासून आमच्या शाळेत IBT हा उपक्रम सुरु झाला. हा उपक्रम सुरु करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठी अनेक विविध उपक्रम शालेय पातळीवर योजले जातात. परंतु मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (V1) विषयामध्ये विध्यार्थ्यांना बौद्धिक कौशल्या बरोबरच व्यवहारीक कौशल्याचे शिक्षण मिळते.विध्यार्थी सृजनशील विचार करतात,हाताने कृती करतात, तर्क संगत विचार करून अनुमान काढतात. या अभ्याक्रमात मन ,मेंदू व मनगट या तीनही गोष्टींचा विद्यार्थी एकाच वेळी वापर करतात. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर मानसिक विकासाला देखील चालना मिळते. पुढे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यातील उद्यमशील नागरीक तयार व्हायला नक्की मदत होईल.

 
विज्ञान आश्रम ची तत्वे.:-
१.हाताने काम करत करत शिकणे - हि शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे.यात केवळ पुस्तकातून पाठांतर न करता विद्यार्थी विविध कामे करत करत त्या विषयासंबंधी तत्वे आत्मसात करतो.

 
२.बहुविध कौशल्यांचे शिक्षण - केवळ एखादे विशिष्ट कौशल्य शिकण्यापेक्षा विध्यार्थ्यांनी विविध कौशल्याचे शिक्षण घेणे फायदेशीर असते.विद्यार्थ्यांना विविध कामाची ओळख होते व त्यातून त्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.

 
३.शाळा हे उत्पादन केंद्र असावे - विद्यार्थ्याना कामाचा प्रत्यक्षात अनुभव मिळावा.यासाठी त्यांनी प्र्त्यक्स्त कामात सहभाग घेणे आवश्यक असते.शाळेत उत्पादन व्हावे व त्या द्वारे समाजाला योग्य दरात सेवा पुरवल्या जाव्यात.असा विज्ञान आश्रम चा प्रयत्न असतो.

 
४.निर्देशक हाच उद्योजक असावा.

 
"मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख " (v1) ची सुरुवात १९८७ साली झाली.इ.आठवी ते १० वी चे विद्यार्थी 'हाताने काम करत शिकणेया तत्वावर शिकतात या अभ्यासक्रमास v1 म्हणून S.S.C. बोर्डाची मान्यता आहे व कोणत्याही शाळेमध्ये टो राबविता येतो.आठवड्यातील एक दिवस शाळेमध्ये या विषयासाठी द्यावा लागतो.

१) अभियांत्रिकी
२) उर्जा व पर्यावरण
३) शेती - पशुपालन
४) गृह - आरोग्य

 
या चार विभागामध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जातो.

 
ज्ञानदा शिक्षण मंडळाचे ,ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव.मध्ये आय.बी.टी सन १४ मार्च २०१६ पासून सुरु झाली आय.बी.टी सुरु होण्यामागे मुख्याध्यापिका सौ. नीलम येवले यांचा खुप मोलाचा वाटा आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वी पाऊल उचलले. विज्ञान आश्रम यांच्या सौजन्याने I.B.T. साहित्य उपलब्ध झाले.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम गावातील वाड्या वस्त्या पर्यंत पोहाचला. त्याचबरोबर परीसरातील इतर गावापर्यंत या उपक्रमाची माहीती पोहचली . त्यामुळे शाळेची पटसंख्या वाढू लागली.

 
विद्यार्थांना होणारे फायदे - 
  • हा अभ्यासक्रम बहुविध कौशल्याचा असल्याने विध्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील  करिअरची  दिशा निवडण्यासाठी मदत होते. अनेक कौशल्यांची ओळख झाल्याने तो त्याच्या आवडीचे एक क्षेत्र निवडू शकतो .
  • महत्त्वाचे म्हणजे विविध अनुभव मिळाल्याने विध्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते. विविध शाखांचे ज्ञान मिळाल्याने त्याला विविध मुलभूत तत्त्वे व त्यांचे महत्त्व याची ओळख होते.
  • प्रत्यक्ष व्यवहारात काम करताना आपल्याला अनेक कौशल्याचा वापर करावा लागतो . उदा. शेतकऱ्याला शेतीच्या ज्ञानाबरोबर वीज , मोटार पंप, खाद्य संरक्षण व प्रक्रिया , पशु वैद्यकीय ज्ञान लागते. त्यामुळे अडचणीच्या वेळी तो मार्ग काढू शकतो. एखाद्या फॅब्रिकेशन व्यवसायिकाला जर पोल्ट्री बांधण्याचे काम मिळाले तर त्याला पोल्ट्रीचे मुलभूत ज्ञान हे फायद्याचे ठरू शकते, तो गिऱ्हाईकाला अधिक चांगली सेवा देऊ शकतो , अशा प्रकारचा आंतरशाखीय दृष्टीकोन विकसित होतो.

     


आय.बी.टी. विभाग



No comments:

Post a Comment