बीज प्रक्रिया तंत्रज्ञान
ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील इयत्ता नववीचे विद्यार्थी बीज प्रक्रिया म्हणजे काय हे शिकले. बियांची रोग प्रतिकार शक्ती, उगवण क्षमता ,उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया केली जाते.
विद्यार्थ्यांनी मेथीचे बी घमेल्यामध्ये घेऊन त्यावर गुळाचे पाणी शिंपडले व त्यावर मेटलेक्झल या बुरशीनाशकाची पावडर टाकून ते बियाण्याला व्यवस्थित चोळून घेतले. गुळाचे पाणी शिंपडल्यामुळे बुरशीनाशक बियाण्याला चिकटून राहते. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विद्यार्थ्यांनी सावलीत सुकवायला ठेवले व त्यानंतर त्याची लागवड केली.
बीज प्रक्रियेच्या पद्धती विद्यार्थी शिकले 1) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे 2) बी थंड पाण्यात भिजत ठेवणे 3) कोरड्या बियांना औषध चोळणे 4) रोपाची मुळे द्रावणात बुडवून ठेवणे 5) बी कठीण पृष्ठभागावर घासणे.
मेथी भाजी विक्री
ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मेथी भाजी काढणे केली मेथीच्या भाजीच्या जुड्या बांधून विद्यार्थ्यांनी भाजी विक्री केली मेथीच्या भाजीच्या सहा जुड्या निघाल्या होत्या त्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना वीस रुपयाप्रमाणे विकल्या