Thursday, 22 May 2025

शेती व पशुपालन विभाग

  

              सीड बॉल तयार करणे

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी सीड बॉल तयार केले त्यासाठी माती व शेण 2:1 या प्रमाणात घेऊन त्यामध्ये निंबोळी चुरा थोडा टाकला व पाणी टाकून मातीचा घट्ट गोळा होईल असे मिक्स करून घेतले. त्या चिखलाचे छोट्या आकाराचे बॉल तयार करून काही बॉल मध्ये दोन दोन  चिंच चे बी व  काही बोलमध्ये दोन दोन गुलमोहराचे बियाणे टाकून सीड बॉल तयार केले. विद्यार्थ्यांनी 50 सीड बॉल तयार केले. 

सीडबॉलसाठी काळी माती वापरल्यास बीज अंकुरण्यास व योग्य आद्रता टिकून ठेवण्यास मदत होते व निंबोळी पावडर मुळे कीटक व रोगांपासून संरक्षण होते. 

सीड बॉल चे फायदे :  

1. बियाण्यांचे संरक्षण होते.

2. सीड बॉल मुळे बियाणे पक्षी व प्राण्यांकडून खाल्ले जात नाहीत. 

3. बियाणे उडून जाण्यापासून संरक्षण होते. 

4. माती व कंपोस्ट मध्ये बियाणे गुंडाळल्याने बियाण्याची उगवण क्षमता वाढते.

5. सीड बॉल सहजपणे फेकून किंवा गाडून लागवड करता येते.












Thursday, 24 April 2025

शेती पशुपालन विभाग

 

               निंबोळी अर्क तयार करणे 

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील नववीच्या विद्यार्थ्यांनी निंबोळी अर्क तयार केला. 


निंबोळी अर्क तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नऊ लिटर पाण्यात पाच किलो निंबोळी चुरा 24 तास भिजत ठेवला. व एक लिटर पाण्यात 200 ग्रॅम निरमा पावडर भिजत ठेवली . दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी निंबोळीचा चुरा गाळून घेतला व त्यात निरमा पावडर चे द्रावण टाकून ढवळून घेतले हे  दहा लिटर निंबोळी अर्क तयार झाला. ( 5% निंबोळी अर्क चे द्रावण तयार झाले) 

वापरण्याची मात्र  : 90 लिटर पाण्यात दहा लिटर निंबोळी अर्क टाकून फवारणी करावी. ज्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे त्या दिवशी निंबोळी अर्क तयार करावा .

निंबोळी अर्क चे फायदे :  

 1. Azadirectine या घटकामुळे किडी व अंडी तयार होत नाहीत.

2. किडींना अंडे घालण्यास प्रतिबंध करतो. 

3. रासायनिक किटकनाशकामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. 

4. जमिनीतील सूत्र कृमी व मुळे   कुरतडणाऱ्या अळ्या वर नियंत्रण होते.





















Thursday, 10 April 2025

शेती व पशुपालन

   

                कंपोस्ट खत तयार करणे

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी गौ केंद्रित चे रस्सगर्भ डी कंपोजर व गूळ वापरून सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून ते डी कंपोजर पालापाचोळ्यावर टाकले व त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी झाकून ठेवले. सूक्ष्मजीवांद्वारे सेंद्रिय पदार्थांचे विघटन चांगल्या प्रकारे होते.

सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी 50 लिटर पाण्यात एक किलो गूळ व दहा ग्रॅम रस गर्भ चे डी कंपोजर पावडर टाकून 24 तास भिजत ठेवले व दुसऱ्या दिवशी पालापाचोळा व शेणखत एका आड एक एक थर देऊन त्यावर डी कंपोजर चे द्रावण झारीने टाकले व बेड पूर्णपणे भरून घेऊन झाकून ठेवला.

कंपोस्ट खताचे फायदे : 

1. जमिनीचा पोत सुधारतो. 

2. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 

3. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. 

4. पिकांची वाढ चांगली होते उत्पादन वाढते .

5. नापिक जमीन सुपीक होते.
























Tuesday, 25 March 2025

शेती पशुपालन विभाग

 वेलवर्गीय पिकांना काठीचा आधार देणे व मांडव तयार करणे.

        ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी ग्रो बॅग मध्ये वेलवर्गीय पिकाच्या बियाण्यांची लागवड केली होती चार बॅग मध्ये दोडका तीन बॅग दुधी भोपळा तीन बॅग घेवडा अशाप्रकारे दहा ग्रो बॅग मध्ये वेलवर्गीय पिकाचे बियाणे लागवड केली होती ते पिके मोठी झाल्यानंतर त्यांना आधार देण्यासाठी विद्यार्थ्यांनी मांडव तयार केला.

 वेलवर्गीय पिकाला मांडव तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोल व लाकडाचा वापर करून मांडव तयार केला त्यावर बांबूच्या काट्या टाकून तारेने व्यवस्थित बांधून घेतले. 

ग्रोबॅगमध्ये बांबूची काठी रोवून सुतळीच्या साह्याने वेल बांधून घेतले व नंतर ते ग्रोबॅग मांडवाच्या खाली ठेवून वेल मांडवावर वाढण्यासाठी व्यवस्थित अडकवून दिले.































Tuesday, 18 March 2025

शेती पशुपालन विभाग

             करडई भाजी काढणी व विक्री.  

     

        ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथील आठवीच्या विद्यार्थ्यांनी  रानबांधणीच्या सपाट वाफा या  पद्धतीचा वापर करून दोन वाफ्यांमध्ये करडई भाजी बियाणे टाकले होते ती भाजी काढण्यायोग्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजीची काढणी करून विक्री केली.















Tuesday, 25 February 2025

शेती पशुपालन विभाग

सप्त धान्यांकुर संजीवक तयार करणे.


ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी पिकांची वाढ व फळांची वाढ चांगली होण्यासाठी व पिकांना संजीवक मिळण्यासाठी सत्ताधान्याकुर हे संजीवक तयार केले.

सप्तधाण्यांकुर संजीवक तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी  गहू उडीद मटकी मूग तीळ हरभरा चवळी या धान्याचे प्रत्येकी 100 ग्रॅम  बियाणे घेतले. व ते बियाणे  प्लास्टिकच्या कुंडीमध्ये 24 तासासाठी  बियाणे भिजतील एवढ्या पाण्यात भिजत ठेवले. 24 तासानंतर विद्यार्थ्यांनी ते बियाणे मिक्सरला बारीक केले व चाळणीतून वस्त्रगाळ करून ते द्रावण पिकावर फवारले. सप्तधाण्यांकुर तयार केल्यानंतर 48 तासाच्या आत पिकावर फवारणी करावी. 

 सप्तधाण्यांकुर फवारल्यामुळे पिकांची वाढ व फळांची वाढ चांगली होते तसेच पिकांना संजीवके मिळतात. 















Monday, 24 February 2025

शेती पशुपालन विभाग

   

            मेथी भाजी काढणी व विक्री.

       ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथील विद्यार्थ्यांनी मेथी भाजीची लागवड केली होती त्या मेथी भाजीची काढणी करून विद्यार्थ्यांनी विक्री केली. 

विद्यार्थ्यांनी तीन वाफ्यांमध्ये अर्धा किलो मेथी भाजीचे बियाणे टाकले होते ती भाजी काढणे योग्य झाल्यावर विद्यार्थ्यांनी भाजीची काढणी करून दहा जुड्या बांधल्या व वीस रुपये प्रमाणे विक्री केली. विद्यार्थ्यांना मेथीची भाजी विक्री करून 200 रुपये मिळाले.














Tuesday, 21 January 2025

शेती पशुपालन विभाग

       ग्रोबॅग मध्ये वेलवर्गीय बियाणे लागवड.

       ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील नववीच्या विद्यार्थ्यांनी ग्रोबॅगमध्ये माती भरून त्यामध्ये कारले, घेवडा, दोडका, दुधीभोपळा या वेलवर्गीय बियाण्याची लागवड ग्रोबॅगमध्ये केली व त्याला झारीने पाणी दिले.



















Thursday, 9 January 2025

शेती पशुपालन विभाग


           वांगी मिरची रोपे पीक लागवड.


           ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील  नववीच्या विद्यार्थ्यांनी रानबांधणीच्या पद्धतीमध्ये सरीवरंबा या पद्धतीचा वापर करून वांगी व मिरची या पिकांच्या रोपांची लागवड केली. विद्यार्थ्यांनी सरीवरंबा तयार करून अगोदर ते वरंबे  पाणी सोडून ओलवून घेतले व त्यामध्ये

वांग्याची पंचगंगा या जातीची 45 रोपांची लागवड विद्यार्थ्यांनी सरीवरंबावरती केली दोन रोपातील अंतर दीड फूट व दोन ओळीतील अंतर अडीच फूट ठेवले. 

     तसेच विद्यार्थ्यांनी मिरचीची प्राईड जातीची 130 रोपे सरीवरंबावरती लावली. 










Wednesday, 11 December 2024

शेती व पशुपालन विभाग


               गांडूळ खत तयार करणे 


ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे आठवीचे व नववीचे विद्यार्थी गांडूळ खत तयार करण्यास शिकले .    

गांडूळ खत म्हणजे गांडूळे सेंद्रिय पदार्थ खाऊन जी विष्ठा बाहेर टाकतात त्याला गांडूळ खत असे म्हणतात.

    गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारा बारा फूट लांब चार फूट रुंद व तीन फूट उंचीचा गांडूळ खताचा रेडीमेड बेड शाळेकडे होता. 

त्या बेडमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडाचा पालोपाचोळा बेडच्या तळाशी टाकला त्यावर शेणखताचा थर परत पालापाचोळ्याचा थर शेण खताचा थर असे एक आड एक थर देऊन गांडूळ खताचा बेड भरून घेतला व गांडूळ खत चाळल्यानंतर त्यामधून जे इसीनिया फोएटीडा जातीची गांडूळ निघाले होते ते विद्यार्थ्यांनी बेडमध्ये टाकले. व बेडला भरपूर पाणी सोडले. चार महिन्यांमध्ये गांडुळे हा पालापाचोळा व शेणखत खाऊन चांगल्या प्रतीचे गांडूळ खत तयार करतात. आपण बेड मध्ये किती प्रमाणात गांडूळ सोडतो यावर गांडूळ खत तयार होण्याचा कालावधी डिपेंड असतो.

  * गांडूळ खताचे फायदे--1) गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. 2)जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. 3) पाणी देण्याचा कालावधी कमी होतो. 4)रासायनिक खतांवरचा खर्च कमी होतो.5) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.6) जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत वाढ होते 7) गांडूळ खातात ह्युमसचे प्रमाण जास्त असल्याने नत्र स्फुरद पालाश पिकांना लगेच उपलब्ध होते.











Friday, 6 December 2024

शेती व पशुपालन विभाग

             

                  गांडूळ खत चाळणे 

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात गांडूळ खत तयार करण्यासाठी बेड भरला होता इसिनिया फोएतिडा या जातीच्या  गांडूळ नी चार महिन्यांमध्ये कचऱ्यापासून व शेणखतापासून चांगल्या प्रतीचे खत तयार केले त्या बेड मध्ये तयार झालेले गांडूळ खत विद्यार्थ्यांनी चाळून घेतले.
    200 किलो कचऱ्यापासून अंदाजे 60 किलो गांडूळ खत तयार झाले यासाठी आम्हाला चारशे रुपये खर्च आला.











Wednesday, 27 November 2024

शेती व पशुपालन विभाग


     जमीन तयार करणे व शेतात एक पीक घेणे

 ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील आठवी व नववीचे विद्यार्थी जमीन तयार करून शेतात एक पीक घेण्यास शिकले. 

जमीन तयार करणे म्हणजे जमिनीची मशागत करणे जमिनीची मशागत करत असताना कुदळीच्या साह्याने विद्यार्थ्यांनी माती भुसभुशीत करून घेतली त्यामध्ये निघालेले दगड गवत वेचून जमीन स्वच्छ करून घेतली व शेतात कोणते पीक घेणार आहे त्यानुसार रान बांधणी केली. रान बांधणे मध्ये सपाट वाफा, सरी वरंबा, सारा ,गादीवाफा ,आळे पद्धत या पद्धतींचा समावेश होतो.

विद्यार्थ्यांना पालक व धना या पिकाची लागवड करायची होती म्हणून विद्यार्थ्यांनी सपाट वाफा तयार केला व त्यामध्ये चार वाफे पालक बियाणे टाकले व पंजाच्या साह्याने राहळून   घेतले व त्या वाफ्यांना पाणी सोडले.

  तसेच पाच वाफ्यांमध्ये धना बियाणे टाकून पंजाच्या सहाय्याने राहळून   घेतले व वाफ्यांना पाणी दिले.

  शेतात पीक घेताना कोणकोणत्या प्रकारची मशागत केली जाते हे विद्यार्थी शिकले तसेच कोणते पीक घेणार आहे कोणत्या पिकानुसार कशा प्रकारची रान बांधणी करायची हे विद्यार्थी शिकले. शेती उपयुक्त साहित्यांमध्ये कोणते साहित्य कोणत्या कामासाठी वापरतात हेही विद्यार्थी शिकले. 

                 पालक लागवड









धना लागवड