Friday, 22 September 2023

शेती व पशुपालन विभाग

             बीज प्रक्रिया

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी मेथी बियाण्यास बीज प्रक्रिया केली. *बीज प्रक्रिया म्हणजे* बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी आणि जोमदार रुपये येण्यासाठी बियाण्यांवर वेळोवेळी जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया केली जाते याला बीज प्रक्रिया म्हणतात. *बीज प्रक्रियेचे फायदे -* 1)बीज प्रक्रियेमुळे जमिनीतून व बियांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. 2)उगवण क्षमता वाढवता येते.3) रोपांची वाढ जोमाने होते .4)पिकाच्या उत्पादनात वाढ होते .5)रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते. 6)रोगप्रतिकारशक्ती वाढते.

बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती-1) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे (बोरीचे बी).2) बी थंड पाण्यात भिजत ठेवणे (ज्वारीचे बी) .3) कोरड्या बियांना औषध व जिवाणू संवर्धक चोळणे.4) रोपाची मुळे द्रावणात बुडवून ठेवणे .5)बी  कठीण पृष्ठभागावर घासणे (कोथिंबीर बी)

बीज प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशकांची नावे -थायरम, गंधक, मेटॅलेक्सल, कार्बेन्डेझीम, कॅप्टन. जिवाणू संवर्धन ची नावे अझोस्पिरिलियम ,अझोटोबॅक्‍टर, रायझोबियम ,स्फुरद विरघळविणारे जिवाणू

विद्यार्थ्यांनी हातात हात मोजे घालून अर्धा किलो मेथीचे बियाणे एका घमेल्यात घेतले त्यावर दोन ग्रॅम गुळाचे पाणी शिंपडले व त्यावर मेटलक्सल पावडर चोळले व बियाणे पेपर वर सावलीत सुकण्यासाठी ठेवून दिले. (गुळाच्या चिकटपणामुळे पावडर बियाण्याला चिकटून बसण्यास मदत होते)




No comments:

Post a Comment