दशपर्णी अर्क
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय कीटकनाशक म्हणजेच दशपर्णी अर्क तयार केला पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोग किडींसाठी उपाय म्हणून दशपर्णी अर्क तयार केला
दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 250 ग्रॅम कडुलिंब पाला , 100 ग्रॅम निरगुडी पाला , 100 ग्रॅम घाणेरीपाला , 100 ग्रॅम गुळवेल पाला , 100 ग्रॅम एरंडपाला , 100 ग्रॅम सीताफळ पाला , 100 ग्रॅम पपई पाला , 100 ग्रॅम रुई पाला , 100 ग्रॅम करंज पाला , 100 ग्रॅम कन्हेर पाला , 100 ग्रॅम गाईचे शेण , 250 ग्रॅम गोमूत्र हे साहित्य घेऊन वीस लिटरच्या बॅरल मध्ये दहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये टाकले व बांबूच्या काठीने दररोज दोन ते तीन वेळा डावीकडून उजवीकडे एक महिना ढवळले .30 दिवसानंतर हे द्रावण पूर्णता आंबल्यावर गाळून घ्यावे.
अडीच लिटर दशपर्णी अर्क 200 लिटर पाण्यात मिक्स करून प्रति एकर क्षेत्रावर फवारावे
पिकावर येणाऱ्या रोग व किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क हा रामबाण उपाय आहे.
No comments:
Post a Comment