शेती व पशुपालन विभाग
मुरघास तयार करणे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी
मक्याची कुट्टी करून मुरघास तयार केला.
५ किलो मका कुट्टीसाठी, ५ ग्रम युरिया,
५ग्रम मिनरल पाउडर, १० ग्रम गुळ, ५ग्रम मीठ, २५०ml ताक वेगवेगळ्या भांड्यांमध्ये
घेतले. युरिया, मिनरल पाउडर, गुळ, मीठ, २०ml पाण्यात विरघळून घेतले. युरियाची
मोकळी स्वच्छ गोण घेऊन त्यात १० सेमी चा कुट्टीचा थर दिला व त्या थरावर वरील
सगळ्याचे थोडे थोडे द्रावण शिंपडले. पुन्हा कुट्टीचा थर देऊन द्रावण शिंपडले.
अशाप्रकारे थर देऊन द्रावण बॅग हवाबंद करून ठेवली.
मुरघासाचे फायदे –
१) वर्षभरात
केंव्हाही हिरवा चारा उपलब्ध असेल तेंव्हा मुरघास करता येतो.
२) मुरघासामुळे जनावरांना वर्षभर हिरवा
चारा उपलब्ध होतो.
३) वाळलेल्या चारयापेक्षा मुरघासात
पौष्टिकता व अन्नद्रव अधिक प्रमाणात असतात.
४) मुरघास हा रुचकर, स्वादिष्ट व
पचायला हलका असतो.
५) दररोज पिक कापणे, वाहतूक, कुट्टी करणे, यावरील
वेळ,खर्च व श्रमाची बचत होते.
No comments:
Post a Comment