Tuesday, 16 May 2023

समर कॅम्प

 

              थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज  पुण्यतिथी 

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव , येथे सहा मे रोजी थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांची100  वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली व त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022 -2023 चा निकाल देण्यात आला.












                                             समर कॅम्प

ज्ञानदा विद्या मंदिर येथे 8  मे 2023  ते 13 मे 2023 दरम्यान सकाळी आठ ते दहा या वेळात समर कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवण्यात आल्या त्यामध्ये 1) पहिल्या दिवशी अग्निशामक नळकांडे वापरून आग कशी विजवली जाते. तसेच जुन्या बांगड्यांना रेशीमचा रंगीत धागा वापरून बांगडी नवी कशी बनवली जाते हे शिकवले.2) दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना पिझ्झा बनवायला शिकवले .3)तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पुठ्ठा , सेल, फॅन यांचा वापर करून कुलर बनवायला शिकवले . 4) चौथ्या दिवशी उंदीर पकडण्याचा सापळा बनवायला शिकवले. 5) पाचव्या दिवशी फोटो पासून रिल्स बनवायला शिकवले तसेच त्याला गाणी टाकणे इफेक्ट देणे व्हिडिओला गाणे बदलने हे शिकवले .6) सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांना  इंजेक्शन चा वापर करून हायड्रोलिक क्रेन बनवायला शिकवले व  विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन समर कॅम्प ची सांगता केली.














Wednesday, 26 April 2023



 ज्ञानदा विद्या मंदिर येथे समर कॅम्पचे आयोजन केले तेथे मुलांना कुलर त्याचप्रमाणे हायड्रोलिक क्रेन तयार करायला शिकवली तेथे क्राफ्ट किचन ऍक्टिव्हिटी शेती पशुपालन ची माहिती त्याचप्रमाणे अभियांत्रिकी विभागात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या





 ऊर्जापर्यावरण विभागातील प्रात्यक्षिकाचे स्विच बोर्ड नवीन बसवले त्याचप्रमाणे पट्टी फिटिंग करून वायरिंग केली




Monday, 24 April 2023

शेती पशुपालन विभाग

                                                       वार्षिक परीक्षा 2022 -2023

ज्ञानदा विद्या मंदिर येथे एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र परीक्षा 2023 पार पाडली.
















                                                समर कॅम्प नियोजन

मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर कॅम्प संदर्भात श्री महेंद्र भोर सर ,ज्ञानदा विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.येवले मॅडम यांनी मार्गदर्शन केले.












Wednesday, 29 March 2023

गांडूळ खत चाळण्यासाठी चाळा तयार केला.                               

 चाळा तयार करण्यासाठी साहित्य  टेन लेस जाळी, बॅटम पट्ट्या, स्क्रू, चुका, इत्यादी साहित्य वापरून चाळा तयार केला .  * 1500 रुपये आला आहे. व तो चाळा शेती विभागातील गांडूळ खत चालण्यासाठी दिला.




 फ्युजची माहिती घेणे तो सर्किटमध्ये जोडणी एमसीबी ची माहिती घेणे त्याची जोडणी करणे त्याचे रेटिंग नुसार एंपियर काढणे अर्थिंग ची माहिती घेणे अर्थिंग करणे




Monday, 6 March 2023

शेती व पशुपालन विभाग

                                                                   धना काढणे व विक्री

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी धना काढून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विक्री केला.
















                                                                गांडूळ खत

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार झालेले गांडूळ खत चाळून घेतले व  गांडूळ खताची शेतकऱ्यास विक्री केली.











Wednesday, 22 February 2023

फावडी तयार केली.     

फावडी तयार करण्यासाठी फावडी पत्रा लोखंडी पाईप लोखंडी पट्टी इत्यादी साहित्यांचा वापर करून त्यास वेल्डिंग केली व चार फावडी तयार केल्या कलर दिला. 

चार फावडीना प्रत्येकी 250 रुपये.   व त्या शेती विभागात साठी दिल्या  .






 

क्लॅप स्वीच चे सर्किट तयार करून त्याला बल्ब जोडून टाळी वाजवून बल्ब चालू बंद केला. सर्किटला बारा होल्ट अडॅप्टर बसवला



Thursday, 9 February 2023

शेती पशुपालन विभाग

                                                           ग्लोबल कृषी प्रदर्शनास भेट

कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे भरलेल्या ग्लोबल कृषी प्रदर्शनास इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन शेतीविषयक वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती घेतली. मातीविना शेती कशी केली जाते. दशपर्णी अर्क, नीम अर्क, मिरची अर्क , लेंडीखत शेती, आळंबी उत्पादन, उपयुक्त साहित्य, अवजारे यांची माहिती विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शनात घेतली पिकांच्या वेगवेगळ्या जाती ते पहावयास मिळाल्या.











                                                                    गांडूळ खत

गांडूळ खत बेड मधील गांडूळ खत विद्यार्थ्यांनी हलवून घेतले खालचे खत वर घेतले व वरचे खत खाली गेले गांडूळ खत वर खाली केल्यामुळे न कुजलेले खत कुजण्यास मदत होते.





Sunday, 29 January 2023

शेती पशुपालन विभाग

                                                      शेती पशुपालन विभाग

                                                      मेथी भाजी काढणे व विक्री

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बेड मधील मेथीची भाजी काढून विक्री केली .मेथीच्या भाजीच्या बारा जुडी निघाल्या 15 रुपये प्रमाणे भाजीची शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना विक्री केली.




















Wednesday, 25 January 2023

 शेती विभागातील पाईपलाईन लिकेज  काढले                     

 हेक्सा फ्रेमच्या साह्याने पाईप कटिंग करून घेतला व सॉकेट वापरून व सोल्युशन वापरून पाईप जोडणी केली






 शाळेतील आयसीटी लॅब मधील सर्व कम्प्युटरचे इलेक्ट्रिक बोर्ड नवीन तयार करून व वायरिंग करून बसवल केसिंगपत्ती नवीन बसून वायरिंग केले