नारायणगाव
नारायणगाव
नारायणगाव हे पुणे नाशिक रोडवरआहे. नारायणगाव हे तमाशा पंढरी म्हणून ओळखले जाते.
नारायणगाव हे जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. एकूण लोकसंख्या २०४५६ असून एकूण घरांची संख्या ४६९१ इतकी आहे.
या गावात प्रसिध्द असे टोमॅटो मार्केट आहे. हे गाव द्राक्ष , बटाटे , तसेच भाजी पाला व फुले या साठी देखील प्रसिध्द आहे. याव्याव्सायातून बरीच मोठी आर्थीक उलाढाल होते.
नारायणगावमध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे.
महत्वाची ऐतिहासिक ठिकाणे
१. शिवनेरी किल्ला: नारायणगावपासून २० किमी. अंतरावर जुन्नर येथील शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
२. अष्टविनायक गणपती- ओझर- १६ किमी. अंतरावर आहे.
३. अष्टविनायक गणपती- लेण्याद्री- २८ किमी. अंतरावर आहे.
4. आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण G.M.R.T नारायणगाव पासून 9 किमी, अंतरावर खोडद येथे आहे.
No comments:
Post a Comment