धना काढणे व विक्री
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी धना काढून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विक्री केला.
गांडूळ खत
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार झालेले गांडूळ खत चाळून घेतले व गांडूळ खताची शेतकऱ्यास विक्री केली.
धना काढणे व विक्री
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी धना काढून शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विक्री केला.
गांडूळ खत
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार झालेले गांडूळ खत चाळून घेतले व गांडूळ खताची शेतकऱ्यास विक्री केली.
ग्लोबल कृषी प्रदर्शनास भेट
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे भरलेल्या ग्लोबल कृषी प्रदर्शनास इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन शेतीविषयक वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती घेतली. मातीविना शेती कशी केली जाते. दशपर्णी अर्क, नीम अर्क, मिरची अर्क , लेंडीखत शेती, आळंबी उत्पादन, उपयुक्त साहित्य, अवजारे यांची माहिती विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शनात घेतली पिकांच्या वेगवेगळ्या जाती ते पहावयास मिळाल्या.
गांडूळ खत बेड मधील गांडूळ खत विद्यार्थ्यांनी हलवून घेतले खालचे खत वर घेतले व वरचे खत खाली गेले गांडूळ खत वर खाली केल्यामुळे न कुजलेले खत कुजण्यास मदत होते.
शेती पशुपालन विभाग
मेथी भाजी काढणे व विक्री
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बेड मधील मेथीची भाजी काढून विक्री केली .मेथीच्या भाजीच्या बारा जुडी निघाल्या 15 रुपये प्रमाणे भाजीची शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना विक्री केली.
धना व मेथी लागवड
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बेड मध्ये धना व मेथी चे बियाणे टाकले. व पंजाच्या साह्याने हलवून घेतले.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बेडमध्ये तयार झालेले गांडूळ खत चाळून घेतले.
ग्रो बॅग भरून रोपांची लागवड करणे
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माती कोकोपीट व गांडूळ खत मिक्स करून ग्रोबॅग भरून घेतल्या व त्या बॅग मध्ये झेंडू, वांगी ,मिरची, टोमॅटो ,फ्लावर या रोपांची लागवड केली व त्या रोपांना पाणी दिले