Tuesday, 26 June 2018

 

 

दिनांक 23 जून 2018 रोजी आमच्या  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री वल्लभ बेनके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.


आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन  

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2018 रोजी शाळेमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी योग शिक्षिका सौ. अंजली पारगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

शैक्षणिक वर्ष सन २०१८ -१९

शैक्षणिक वर्ष सन २०१८ -१९

१५ जून २०१८ शालेय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची सुरुवात झाली. शाळेत इयत्ता ५ वी त आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व कॅडबरी देऊन स्वागत केले. संस्थेचे सचिव मा. श्री. अमित बेनके व मानद सचिव मा. श्री डी.डी.डोके यांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.


 

Sunday, 3 June 2018

शेती पशुपालन विभाग

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव 

शेती पशुपालन विभाग

आय बी टी मधील शेती पशुपालन विभागातील निदेशक सौ. विधाटे स्वाती यांनी विज्ञान आश्रम, पाबळ येथे 25 मे ते २९ मे २०१८ रोजी शेती चे ट्रेनिंग घेतले. 

ट्रेनिंग मध्ये मातीचा नमुना घेऊन माती परीक्षण केले. शेती पिकासाठी  खताचा डोस काढला.  सॅक गार्डन ची माहिती घेतली. कोंबडी पालनासाठी लागणारे पशुखाद्य तयार केले. कोकोपीट ट्रे मध्ये वांगी, दुधी भोपळा बिया लावल्या.






Wednesday, 16 May 2018

आय.बी.टी.उर्जा व पर्यावरण विभाग

 उर्जा व पर्यावरण  विभाग

अभियांत्रिकी विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अपंग व वृद्ध व्यक्तींसाठी चालताना कमी त्रास व्हावा व कोणाचा आधार न घेता वॉकर व बहुउपयोगी जी अंधारात तसेच लक्ष वेधण्यासाठी उपयोगी पडेल अशी  काठी तयार केली. 


Tuesday, 15 May 2018

आय. बी.टी .विभागांचीर द्वितीय सत्र परीक्षा २०१७ -२०१८ घेण्यात आली

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांची  आय. बी.टी .विभागांतील अभियांत्रिकी ,ऊर्जा पर्यावरण , शेती पशुपालन ,गृह आरोग्य या चारही विभागांची द्वितीय सत्र लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.


आय.बी.टी निदेशकांनी व्हिडीओ कॉनफरान्सिंग द्वारे घेतले प्रशिक्षण. घेतले



१५ मे २०१८ रोजी ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव या ठिकाणी चास,ना.गाव,हिवरे आणि बोरी या चारही शाळांमधील निदेशकांनी आज  व्हिडीओ कॉनफरान्सिंग द्वारे प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षण वर्गात जे.पी.नाईक सेंटर पुणे या ठिकाणाहून विज्ञान आश्रम चे  श्री.सचिन पुणेकर यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण वर्गात एकूण १५ निदेशकांनी सहभाग घेतला.
या मध्ये ऑनलाइन रिपोर्ट उत्तम प्रकारे कसा भरावा तसेच ब्लॉग वर  पोस्ट कश्या कराव्यात व ब्लॉग अपडेट करणे. याबद्दल माहिती देण्यात आली.



Tuesday, 3 April 2018

आय.बी.टी.गृह आरोग्य विभाग

 

 

गृह आरोग्य विभाग

इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी सोलर ड्रायर वर भेंडी व टोमॅटो ड्राय केले. भाज्या व इतर गोष्टी कोणत्याही रसायनांचा वापर न करता वाळवल्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याचा जराही धोका नसतो.  वर्षभर आपल्याला आपल्या आवडत्या भाज्या खाता  येऊ  शकतात.
भाज्या वाळवण्याची कृती अगदी सोप्पी आहे. 

आपल्याला ज्या भाज्या किंवा फळं वाळवायची असतील त्या कापून धुवून ट्रेवर पसरवायच्या. नंतर तो ट्रे बंद करून टाकायचा. संध्याकाळपर्यंत भाज्या वाळतात. मग त्या डब्यात भरून ठेवायच्या. ज्यावेळी आपल्याला भाज्या वापरायच्या असतील तेव्हा डब्यातल्या भाज्या काढायच्या आणि फोडणीला टाकायच्या.

 उदा : आमटी  करताना कांदा, टोमॅटो घालायचे असतील तर या वाळवलेल्या फोडी वरणात टाकल्या की, त्या मस्त फुलून येतात, कोणाला समजणारसुद्धा नाही इतक्या ताज्या वाटतात. सोलर ड्रायर या उपकरणाद्वारे फळं-भाज्यांची नासाडी सामान्यातली सामान्य व्यक्तीही वाचवू शकते. 


उर्जा व पर्यावरण विभाग


 उर्जा व पर्यावरण  विभाग


उर्जा व पर्यावरण  विभागात  विद्यार्थ्यांनी मिक्सर मोटार दुरुस्ती केली व  विद्यार्थ्यांना  फॅन मोटार फिटिंग कशी करायची ते  शिकवले.  


 

आय.बी.टी. शेती पशुपालन विभाग



 आय.बी.टी. शेती पशुपालन विभाग


आय.बी.टी. शेती पशुपालन विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी दशपर्णी अर्क तयार करून तो विक्री साठी ठेवला आहे.

 


 

आय.बी.टी. अभियांत्रिकी विभाग

आय.बी.टी. अभियांत्रिकी विभाग

आय.बी.टी मधील अभियांत्रिकी विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी डिश टीवी फिटिंग करण्यासाठी स्टूल बनवला. 

 

आय.बी.टी. गृह आरोग्य विभाग

 गृह आरोग्य विभाग


इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी शालेय  विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी केली.

 

 

इयत्ता आठवीचे विद्यार्थी तिखट शंकरपाळी व नान कटाई तयार करताना







Monday, 12 March 2018

रोटरी क्लब नारायणगाव आयोजित मोफत लसीकरण कार्यक्रम

रोटरी क्लब, नारायणगाव  आयोजित  मोफत लसीकरण कार्यक्रम



दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी  विद्यालयामध्ये मध्ये  रोटरी क्लब,  नारायणगाव तर्फे सर्व  विद्यार्थ्यांना MR लस ( गोवर व रुबेला ) चे  मोफत लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. डॉ. काचळे  (अध्यक्ष  रोटरी  क्लब  नारायणगाव ) , मा. डॉ. जोरी, मा. डॉ. हांडे  हे उपस्थित होते.