Tuesday, 3 April 2018

आय.बी.टी.गृह आरोग्य विभाग

 

 

गृह आरोग्य विभाग

इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी सोलर ड्रायर वर भेंडी व टोमॅटो ड्राय केले. भाज्या व इतर गोष्टी कोणत्याही रसायनांचा वापर न करता वाळवल्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याचा जराही धोका नसतो.  वर्षभर आपल्याला आपल्या आवडत्या भाज्या खाता  येऊ  शकतात.
भाज्या वाळवण्याची कृती अगदी सोप्पी आहे. 

आपल्याला ज्या भाज्या किंवा फळं वाळवायची असतील त्या कापून धुवून ट्रेवर पसरवायच्या. नंतर तो ट्रे बंद करून टाकायचा. संध्याकाळपर्यंत भाज्या वाळतात. मग त्या डब्यात भरून ठेवायच्या. ज्यावेळी आपल्याला भाज्या वापरायच्या असतील तेव्हा डब्यातल्या भाज्या काढायच्या आणि फोडणीला टाकायच्या.

 उदा : आमटी  करताना कांदा, टोमॅटो घालायचे असतील तर या वाळवलेल्या फोडी वरणात टाकल्या की, त्या मस्त फुलून येतात, कोणाला समजणारसुद्धा नाही इतक्या ताज्या वाटतात. सोलर ड्रायर या उपकरणाद्वारे फळं-भाज्यांची नासाडी सामान्यातली सामान्य व्यक्तीही वाचवू शकते. 


उर्जा व पर्यावरण विभाग


 उर्जा व पर्यावरण  विभाग


उर्जा व पर्यावरण  विभागात  विद्यार्थ्यांनी मिक्सर मोटार दुरुस्ती केली व  विद्यार्थ्यांना  फॅन मोटार फिटिंग कशी करायची ते  शिकवले.  


 

आय.बी.टी. शेती पशुपालन विभाग



 आय.बी.टी. शेती पशुपालन विभाग


आय.बी.टी. शेती पशुपालन विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी दशपर्णी अर्क तयार करून तो विक्री साठी ठेवला आहे.

 


 

आय.बी.टी. अभियांत्रिकी विभाग

आय.बी.टी. अभियांत्रिकी विभाग

आय.बी.टी मधील अभियांत्रिकी विभागात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी डिश टीवी फिटिंग करण्यासाठी स्टूल बनवला. 

 

आय.बी.टी. गृह आरोग्य विभाग

 गृह आरोग्य विभाग


इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी शालेय  विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी केली.

 

 

इयत्ता आठवीचे विद्यार्थी तिखट शंकरपाळी व नान कटाई तयार करताना







Monday, 12 March 2018

रोटरी क्लब नारायणगाव आयोजित मोफत लसीकरण कार्यक्रम

रोटरी क्लब, नारायणगाव  आयोजित  मोफत लसीकरण कार्यक्रम



दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी  विद्यालयामध्ये मध्ये  रोटरी क्लब,  नारायणगाव तर्फे सर्व  विद्यार्थ्यांना MR लस ( गोवर व रुबेला ) चे  मोफत लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. डॉ. काचळे  (अध्यक्ष  रोटरी  क्लब  नारायणगाव ) , मा. डॉ. जोरी, मा. डॉ. हांडे  हे उपस्थित होते.

कलचाचणी २०१८






 कलचाचणी २०१८


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व् उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ. १० वी च्या विद्यार्थ्याची ‘ कलचाचणी ’ शाळेत घेण्यात आली. कलचाचणी एक मानसशास्त्रीय कसोटी आहे. इ. १० वी. नंतर सामान्यतः उपलब्ध शिक्षणाच्या ७ क्षेत्रीय अभिरुची शोधीकेद्वारे विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला जातो.

 


 

Friday, 23 February 2018

गृह आरोग्य विभाग

इयत्ता ८ वी च्या विद्यार्थी  पॉपकोर्न तयार करून पॅकींग करून विक्री करताना


 

Monday, 5 February 2018

शेती व पशुपालन विभाग




मुरघास तयार करणे.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मक्याची कुट्टी करून मुरघास तयार केला.

५ किलो मका कुट्टीसाठी, ५ ग्रम युरिया, ५ग्रम मिनरल पाउडर, १० ग्रम गुळ, ५ग्रम मीठ, २५०ml ताक वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घेतले. युरिया, मिनरल पाउडर, गुळ, मीठ, २०ml पाण्यात विरघळून घेतले. युरियाची मोकळी स्वच्छ गोण घेऊन त्यात १० सेमी चा कुट्टीचा थर दिला व त्या थरावर वरील सगळ्याचे थोडे थोडे द्रावण शिंपडले. पुन्हा कुट्टीचा थर देऊन द्रावण शिंपडले. अशाप्रकारे थर देऊन द्रावण बॅग हवाबंद करून ठेवली.

मुरघासाचे फायदे –

 

१) वर्षभरात केंव्हाही हिरवा चारा उपलब्ध असेल तेंव्हा मुरघास करता येतो.

२) मुरघासामुळे जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो.

३) वाळलेल्या चारयापेक्षा मुरघासात पौष्टिकता व अन्नद्रव अधिक प्रमाणात असतात.

४) मुरघास हा रुचकर, स्वादिष्ट व पचायला हलका असतो.

५) दररोज  पिक कापणे, वाहतूक, कुट्टी करणे, यावरील वेळ,खर्च व श्रमाची बचत होते.


 

Monday, 29 January 2018

उर्जा पर्यावरण विभाग

उर्जा पर्यावरण विभाग


आय.बी.टी.उर्जा पर्यावरण विभागात विद्यार्थ्यांनी जिना वायरिंग, गोडाऊन वायरिंग केले. आर्थिंग व फ्युज बसविण्यास शिकले.



आय.बी.टी. अभियांत्रिकी विभाग

अभियांत्रिकी विभाग

 इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी २x४ चा बोर्ड तयार केला.
साहित्य – लोखंडी २x४ प्लेट १ इंची, स्क़ेअर ट्यूब, वेल्डिंग रॉड, वेल्डिंग मशीन, वेल्डिंग गाॅगल, कटर मशीन, अॅप्रोन, Hand gloves
कृती – कटर मशीनच्या सहाय्याने मटेरीअल कटिंग केले. त्यानंतर वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने बोर्ड तयार केला.
 


गृहआरोग्य विभागातील ड्रायर ला २०० मायक्रोनचा पेपर चिटकवला.


शेती विभागातील नर्सरीला नळ जोडणी करताना इयत्ता ८ वी चे विद्यार्थी.