Friday, 5 January 2018

गृह आरोग्य विभाग

गृह आरोग्य विभाग

इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी  पोपकोर्न  बनवून  त्याची विद्यार्थी व शिक्षकांना  विक्री केली.  


गृह आरोग्य विभाग

गृह आरोग्य विभाग

इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी  वडापाव   व  खोबऱ्याचे पौष्टिक लाडू  बनवून  त्याची विद्यार्थी व शिक्षकांना  विक्री केली.  




सावित्रीबाई फुले जयंती





 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती


दिनांक ०३-०१-२०१८ शाळेमध्ये  सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. १८व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १८४वी जयंती होती. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

Wednesday, 3 January 2018

शालेय क्रीडा स्पर्धा

शालेय क्रीडा स्पर्धा

दिनांक २९-१२-२०१७ व ३०-१२-२०१७ रोजी शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, १०० व २०० मी. धावणे, रिले, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, दोरउडी इ. प्रकारचे सांघिक व वैयक्तिक खेळ  घेण्यात आले.. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व विद्यार्थ्यांना तालुका स्तर, जिल्हा स्तरावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते.



Tuesday, 2 January 2018

शेती आणि पशुपालन विभाग


शेती आणि पशुपालन



 

इयत्ता 8वी व 9वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेत तयार झालेले गांडूळखत चाळून 200 किलो खत पँकिंग करून स्थानिक शेतकरी, विद्यार्थी पालकात गांडूळखताची विक्री केली.
तयार झालेले गांडूळखत- 200किलो
विक्री झालेले गांडूळखत- 175किलो
दर- 5रु किलो
गांडूळखतताचे फायदे –
1१)    जमिनीचा पोत सुधारणे.
2२)    जमिनीची धूप कमी होणे.
3३)    जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
4४)    जमिनीचा सामू योग्य पातळीने राखला जातो.
5५)    जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
6६)    पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.
7७)    रासायनिक खतांचा खर्च कमी होऊन निरोगी वाढीमुळे कीटकनाशकांच्या खर्चात बचत होते.



उर्जा व पर्यावरण विभाग

उर्जा व पर्यावरण विभाग


इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी दोन टू वे स्वीचचा वापर करून जिना वायरिंग केले. 

एकवन वे स्वीच व तीन टू वे स्वीचचा वापर करून गोडाऊन वायरिंग केले.जिना वरिंग व गोडाऊन वायरिंगसाठी होल्डर व बल्ब चा वापर केला. 

विद्यार्थ्यांना सोल्डरिंग गण व सोल्डरिंग मेटलचा चा वापर करून सोल्डरिंग कसे करावे हे शिकवले छोटे-छोटे सर्किट्स सोल्डर तयार केले. बँटरी व इन्व्हर्टर ची माहिती दिली. 




इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोनिक सर्किटची माहिती दिली. वेगवेगळे काम्पोनंटची माहिती व ते सर्किटमध्ये कसे वापरावेत याची माहिती दिली.
 P.C.B.विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी L.D.R. वापरून सर्कीट तयार केले त्यामध्ये 555 IC वापरला. PCB वर चेक करून बल्ब चालू/बंद केला. उजेडात बल्ब बंद होतो व अंधारात चलू होते हे पाहिले.


 



 


Monday, 1 January 2018

शेती व पशुपालन विभाग

जनावारांसाठी अॅझोला पद्धतीने चारा तयार करणे -  

 जनावरांना चारा तयार करण्याच्या पध्दती पैकी  ibt शेती व पशुपालन विभागाणे  अझोला तयार केला . त्यासाठी 3मीटर *१.५ मीटर लांबी रुंदीचा बेड खणला.व ३० सेंमी खोली ठेवली . बेड मध्ये 3*3 मीटरची ताडपत्री टाकून  ५ किलो शेणगारा करून घमेल्यात नळीने पाणी  सोडले .   ५किलो वडाच्या झाडाखालची माती ५० gram ssp व ५० gram मिनरल powder  टाकली व पूर्ण बेड पाण्याने भरून घेतला . व त्यात १/२ किलो अझोला टाकले . व १२ दिवसानंतर बेड मधून १किलो अझोला काढून विक्री केली.

अझोलाचे फायदे- 
१)दुधाची प्रत व उत्पादन वाढते 
2)उत्पादनास सोपे व स्वस्त 
3)कोरड्या वजनानुसार अझोलात २५-३०% प्रथिने  १०-१२% खनिजे व ७-१०%अमिनो asid असतात 
४)शेळी मेंढी गाय म्हेस ससा माशे कोंबड्या खाद्य म्हणून उपयोगी 
5)१५-२०% आबवनवरचा खर्च कमी होतो