Friday, 6 December 2024

शेती व पशुपालन विभाग

             

                  गांडूळ खत चाळणे 

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात गांडूळ खत तयार करण्यासाठी बेड भरला होता इसिनिया फोएतिडा या जातीच्या  गांडूळ नी चार महिन्यांमध्ये कचऱ्यापासून व शेणखतापासून चांगल्या प्रतीचे खत तयार केले त्या बेड मध्ये तयार झालेले गांडूळ खत विद्यार्थ्यांनी चाळून घेतले.
    200 किलो कचऱ्यापासून अंदाजे 60 किलो गांडूळ खत तयार झाले यासाठी आम्हाला चारशे रुपये खर्च आला.











Wednesday, 27 November 2024

शेती व पशुपालन विभाग


     जमीन तयार करणे व शेतात एक पीक घेणे

 ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील आठवी व नववीचे विद्यार्थी जमीन तयार करून शेतात एक पीक घेण्यास शिकले. 

जमीन तयार करणे म्हणजे जमिनीची मशागत करणे जमिनीची मशागत करत असताना कुदळीच्या साह्याने विद्यार्थ्यांनी माती भुसभुशीत करून घेतली त्यामध्ये निघालेले दगड गवत वेचून जमीन स्वच्छ करून घेतली व शेतात कोणते पीक घेणार आहे त्यानुसार रान बांधणी केली. रान बांधणे मध्ये सपाट वाफा, सरी वरंबा, सारा ,गादीवाफा ,आळे पद्धत या पद्धतींचा समावेश होतो.

विद्यार्थ्यांना पालक व धना या पिकाची लागवड करायची होती म्हणून विद्यार्थ्यांनी सपाट वाफा तयार केला व त्यामध्ये चार वाफे पालक बियाणे टाकले व पंजाच्या साह्याने राहळून   घेतले व त्या वाफ्यांना पाणी सोडले.

  तसेच पाच वाफ्यांमध्ये धना बियाणे टाकून पंजाच्या सहाय्याने राहळून   घेतले व वाफ्यांना पाणी दिले.

  शेतात पीक घेताना कोणकोणत्या प्रकारची मशागत केली जाते हे विद्यार्थी शिकले तसेच कोणते पीक घेणार आहे कोणत्या पिकानुसार कशा प्रकारची रान बांधणी करायची हे विद्यार्थी शिकले. शेती उपयुक्त साहित्यांमध्ये कोणते साहित्य कोणत्या कामासाठी वापरतात हेही विद्यार्थी शिकले. 

                 पालक लागवड









धना लागवड







Wednesday, 20 November 2024

शेती पशुपालन विभाग

                

           अळू  कंद लागवड व अळू पाने विक्री 


ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथे आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी आळू कंदाची लागवड केली. 

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येणारा पोषण आहार खाऊन झाल्यानंतर ज्या डिश धुतल्या जातात त्याचे जाणारे सांडपाणी वायाला जात होते ते पाणी जिथे जाते तिथे विद्यार्थ्यांनी पाट करून त्या ठिकाणी अळू  कंदा ची लागवड केली.  अगोदर लावलेली जी अळूची कंदे होती मोठी झालेली अळू ची पाने विद्यार्थ्यांनी काढणी करून विक्री पण केली.













Sunday, 13 October 2024

शेती व पशुपालन विभाग


                    माती परीक्षण करणे

 ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना स्क्रू आगार च्या सहाय्याने घेतला माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा हे विद्यार्थी शिकले तसेच माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा तयार करावा हे विद्यार्थी शिकले माती परीक्षण करताना काय काळजी घ्यावी हे विद्यार्थी शिकले. 

   मातीच्या नमुन्याचे माती परीक्षण किटवर सामू सेंद्रिय कर्ब नत्र स्फुरद पालाश यांचे परीक्षण केले जाते माती परीक्षणावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगले आहे किंवा नाही हे समजते. 

 विद्यार्थ्यांनी प्रेरणा माती परीक्षण किटवर घेतलेल्या मातीच्या नमुन्याचे माती परीक्षण केले व त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काढले.














Friday, 27 September 2024

शेती व पशुपालन विभाग


                   बीज प्रक्रिया तंत्रज्ञान

 ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील इयत्ता नववीचे विद्यार्थी बीज प्रक्रिया म्हणजे काय हे शिकले. बियांची रोग प्रतिकार शक्ती, उगवण क्षमता ,उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया केली जाते.

 विद्यार्थ्यांनी मेथीचे बी घमेल्यामध्ये घेऊन त्यावर गुळाचे पाणी शिंपडले व त्यावर मेटलेक्झल या बुरशीनाशकाची पावडर टाकून ते बियाण्याला व्यवस्थित चोळून घेतले. गुळाचे पाणी शिंपडल्यामुळे बुरशीनाशक बियाण्याला चिकटून राहते. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विद्यार्थ्यांनी सावलीत सुकवायला ठेवले व त्यानंतर त्याची लागवड केली.

  बीज प्रक्रियेच्या पद्धती विद्यार्थी शिकले 1) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे 2) बी थंड पाण्यात भिजत ठेवणे 3) कोरड्या बियांना औषध चोळणे 4) रोपाची मुळे द्रावणात बुडवून ठेवणे 5) बी कठीण पृष्ठभागावर घासणे.










                          मेथी भाजी विक्री


 ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मेथी भाजी काढणे केली मेथीच्या भाजीच्या जुड्या बांधून विद्यार्थ्यांनी भाजी विक्री केली मेथीच्या भाजीच्या सहा जुड्या निघाल्या होत्या त्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना वीस रुपयाप्रमाणे विकल्या










Thursday, 22 August 2024

शेती व पशुपालन विभाग


              लॅक्टोमीटर रीडिंग घेणे

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी लॅक्टोमीटर च्या साह्याने दुधातील पाण्याचे प्रमाण मोजले 

     लॅक्टोमीटर च्या साह्याने आपण दुधातील पाण्याचे प्रमाण मोजू शकतो. दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याची घनता कमी होते म्हणजे लॅक्टोमीटर दुधामध्ये जास्त प्रमाणात बुडतो.

  विद्यार्थ्यांनी मेजरींग सिलेंडर मध्ये 100 ml दूध घेऊन त्यामध्ये लॅक्टोमीटर गोल फिरवून सोडला. लॅक्टोमीटर च्या रीडिंग वरून शेतकऱ्याकडून आणलेले दूध चांगल्या प्रकारचे होते त्यामध्ये पाणी भेसळ नव्हते हे विद्यार्थी शिकले












Monday, 29 July 2024

शेती पशुपालन विभाग

         गांडूळ खत निर्मिती 


ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी 12 फूट लाब ,चार फुट रुंद व तीन फूट उंचीचा गांडूळ खताचा बेड घेतला व त्यामध्ये सर्वात खालच्या थरामध्ये पालापाचोळ्याचा थर दिला त्यावर कुजलेल्या शेणखताचा तर दिला परत पालापाचोळ्याचा थर असे एक आड एक थर दिले व त्यामध्ये इसीनिया फेटिडा जातीची गांडुळे सोडले गांडूळ खताच्या बेडला गरजेनुसार भरपूर पाणी दिले 15 ते 20 दिवसाच्या अंतराने विद्यार्थ्यांनी बेड मधील पालापाचोळा खालीवर करून घेतला तो गांडूळ आणि बऱ्यापैकी कुजवलेला होता गांडूळ खताच्या बेडमध्ये तीन महिन्यांमध्ये गांडूळ खत उत्तम प्रकारे तयार होते. गांडूळ खताचा बेड सावलीमध्ये ठेवावा गांडूळ खत तयार झाल्यानंतर गांडूळ खताचा रंग काळसर मातीसारखा होतो. विद्यार्थी गांडूळ खत तयार करण्यास शिकले















Saturday, 29 June 2024

शेती पशुपालन विभाग

            रानबांधणीच्या  पद्धती व पीक घेणे 


ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव मधील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी जमीन तयार करण्यासाठी जमिनीची मशागत कोणत्या प्रकारे करतात हे अभ्यासले पेरणीपूर्वमशा गतीमध्ये नांगरणी व वखरणे या कामांचा समावेश होतो तसेच पेरणीच्या मशागत मध्ये रान बांधण्याच्या पद्धती येतात आपण शेतामध्ये कोणते पीक घेणार आहे त्या पीक लागवडीसाठी कशी रान बांधणी केली पाहिजे याचा अभ्यास केला जातो रानबानीच्या पद्धतीमध्ये सपाट वाफा ,सरीवरंबा, सारा, आळे पद्धत, गादीवाफा या पद्धतींचा समावेश होतो शाळेच्या शेतामध्ये पीक घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सपाट वाफे तयार केले तसेच सरीवरंबा तयार केला सपाट वाफेमध्ये विद्यार्थ्यांनी मेथी, धना लागवड केली व भेंडीचे व गवारचे बी टोकून लावले व सरीवरंबावर विद्यार्थ्यांनी मिरचीची रोपे लावली.

















Saturday, 25 May 2024

शेती पशुपालन विभाग

                    समर कॅम्प


ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे सहा दिवसाचा समर कॅम्प घेण्यात आला समर कॅम्प च्या पहिल्या दिवशी परसबागेसाठी रोपे कशी तयार केली जातात हे विद्यार्थी शिकले विद्यार्थ्यांना छाट कलम असून मोगरा गुलाब जास्वंद याची रोपे तयार करायला शिकवली विद्यार्थ्यांनी गांडूळ खत व माती मिक्स करून प्लास्टिक बॅग भरल्या व त्यामध्ये मोगरा जास्वंद गुलाब याचे छाट लावले व झारीच्या साह्याने पाणी घातले समर कॅम्प च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी सिमेंट कुंडी बनवली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जुनं कापड व सिमेंटचा वापर करून प्लास्टिकची कुंडी पालथी घालून त्यावर ओलसर सिमेंट करून जुना कापड त्यात भिजवलं व प्लॅस्टिकच्या कुंडीवर टाकून ती कुंडी सुकण्यासाठी ठेवली. अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सिमेंटच्या कुंड्या तयार केल्या. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण कसे करायचे हे शिकवण्यात आले धोकादायक परिस्थिती मधून कसे बाहेर पडायचे कराटेच्या काही स्टेप विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या. चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन स्किल याबद्दल माहिती देण्यात आली. कोणतेही काम करताना त्याचे ज्ञान क्षमता योग्यता असली पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले पाचव्या दिवशी जुन्या न्युज पेपर पासून वॉल हैंगिंग विद्यार्थ्यांना शिकवले. व सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांना नॉन फायर कुकिंग गॅसचा वापर न करता ब्रेड पासून सँडविच बनवण्यास शिकवले.










Tuesday, 16 April 2024

शेती व पशुपालन विभाग


       द्वितीय सत्र परीक्षा 2023-2024

इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची वर्षभरात विद्यार्थ्यांनी जे चार व्यवसायिक अभ्यासक्रमाचे विभाग अभ्यासले होते 1)अभियांत्रिकी 2)ऊर्जा पर्यावरण 3)शेती व पशुपालन 4)गृह व आरोग्य विभाग या चार विभागांची वार्षिक परीक्षा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची शालेय विषयांची वार्षिक परीक्षा घेण्यात आली






Friday, 29 March 2024

शेती व पशुपालन विभाग

          मेथी भाजी काढणे व विक्री 

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शेती पशुपालन विभागात दोन वाफे मेथी भाजी लागवड केली होती त्या मेथी भाजीची काढणी करून विद्यार्थ्यांनी विक्री केली विद्यार्थी काम करत असताना महाले कंपनीतील अधिकाऱ्यांनी शेती व पशुपालन विभाग ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे भेट दिली.






Friday, 15 March 2024

शेती व पशुपालन विभाग

               गांडूळ खत तयार करणे 

    इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी 12 फूट लाब ,चार फूट रुंद व तीन फूट उंचीच्या गांडूळ खताच्या बेडमध्ये शाळेच्या परिसरातील पालापाचोळा तसेच भाजीपाल्याचे अवशेष भुसा याचा थर दिला. त्यावर भरपूर पाणी मारले त्यानंतर त्यावर कुजलेल्या शेणखताचा थर दिला .परत पालापाचोळा भाजीपाल्याचे अवशेष याचा थर दिला पुन्हा कुजलेले शेणखत असे एका आड एक करत गांडूळ खताचा बेड भरून घेतला व त्यावर इसीनिया फेटेडा या जातीची अर्धा किलो गांडुळे सोडले. व बेड मध्ये भरपूर पाणी मारले. विद्यार्थ्यांनी तीन दिवसांनी बेडला पाणी दिले .एक महिन्यानंतर बेड हलवून घेतला कुजलेले अवशेष वर आले नकुजलेलं खाली गेले गरजेनुसार बेडला पाणी दिले अशा प्रकारे तीन महिने गांडूळ खताची काळजी घेतली .तीन महिन्यानंतर गांडूळ खत तयार झाले. त्या गांडूळ खताचा रंग काळसर मातीसारखा होता ते खत विद्यार्थ्यांनी शेती विभागात जी पिके घेतली जातात त्यासाठी वापर केला.