Friday, 15 March 2024

शेती व पशुपालन विभाग

               गांडूळ खत तयार करणे 

    इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी 12 फूट लाब ,चार फूट रुंद व तीन फूट उंचीच्या गांडूळ खताच्या बेडमध्ये शाळेच्या परिसरातील पालापाचोळा तसेच भाजीपाल्याचे अवशेष भुसा याचा थर दिला. त्यावर भरपूर पाणी मारले त्यानंतर त्यावर कुजलेल्या शेणखताचा थर दिला .परत पालापाचोळा भाजीपाल्याचे अवशेष याचा थर दिला पुन्हा कुजलेले शेणखत असे एका आड एक करत गांडूळ खताचा बेड भरून घेतला व त्यावर इसीनिया फेटेडा या जातीची अर्धा किलो गांडुळे सोडले. व बेड मध्ये भरपूर पाणी मारले. विद्यार्थ्यांनी तीन दिवसांनी बेडला पाणी दिले .एक महिन्यानंतर बेड हलवून घेतला कुजलेले अवशेष वर आले नकुजलेलं खाली गेले गरजेनुसार बेडला पाणी दिले अशा प्रकारे तीन महिने गांडूळ खताची काळजी घेतली .तीन महिन्यानंतर गांडूळ खत तयार झाले. त्या गांडूळ खताचा रंग काळसर मातीसारखा होता ते खत विद्यार्थ्यांनी शेती विभागात जी पिके घेतली जातात त्यासाठी वापर केला.






Tuesday, 20 February 2024

शेती व पशुपालन विभाग

                मेथी भाजी काढणे व विक्री

     

        ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात सपाट वाफे करून 1 kg मेथी  बियाणे टाकले व रहाळून घेतले पाणी सोडले त्या मेथी भाजीची  चांगली वाढ झाल्यावर 1 महिन्याने काढणी करून जुडी बांधली व त्याची 10 रुपये प्रमाणे विक्री केली. विद्यार्थी रान बांधणी ,बियाणे पेरणी, अंतर मशागत, पीक काढणे, विक्री हे शिकले.





Tuesday, 9 January 2024

शेती पशुपालन विभाग

                           धना व मेथी लागवड

ज्ञानदा विद्या मंदिर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी रान बांधणीच्या पद्धती शिकले सपाट वाफा, सरी वरंबा, सारा, आळे पद्धत, गादीवाफा .या पद्धती शिकले. विद्यार्थ्यांनी सपाट वाफे तयार करून दोन वाफ्यात धना लागवड केली व तीन वाफ्यांमध्ये मेथी बियाणे टाकले व पंजाच्या साह्याने बियाणे राहलुन घेतले.







Saturday, 30 December 2023

शेती व पशुपालन

सेद्रिय कीटकनाशक दशपर्णी अर्क तयार करणे

 ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव मधील नववीच्या विद्यार्थ्यांनी दशपर्णी अर्क तयार केला .पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोग व किडींसाठी सेंद्रिय कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क तयार केला जातो त्यासाठी दहा वनस्पतींची पाने घेतली जातात त्यासाठी तीस लिटरच्या प्लास्टिक बॅरल मध्ये दहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये अडीचशे ग्रॅम कडुलिंब पाला 100 ग्रॅम निरगुडी पाला, घाणेरी पाला ,गुळवेल पाला, एरंडपाला ,सीताफळ पाला, पपई पाला ,रुई पाला, करंज पाला , कनेर पाला हे प्रत्येकी 100 ग्रॅम घेऊन त्यामध्ये शंभर ग्रॅम गाईचे शेण अडीचशे ग्रॅम गोमूत्र त्या बॅरल मध्ये टाकून काठीच्या सहाय्याने दिवसातून तीन वेळा एक महिना हे द्रावण ढवळतात ते द्रावण पूर्णतः      आबल्यानंतर गाळून घेऊन पिकावर त्याची फवारणी करतात हे विद्यार्थी शिकले. 








Monday, 27 November 2023

शेती व पशुपालन

          

                    रोपवाटिका तंत्रज्ञान

ज्या ठिकाणी वनस्पतीची रोपे कलमे तयार केली जातात त्याला रोपवाटिका असे म्हणतात.

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोकोपीट, गांडूळ खत व माती व्यवस्थित मिक्स करून रोपे तयार करण्याच्या काल्या पिशवीत ती माती भरून त्यामध्ये पेन्सिल साईजचे जास्वंद, मोगरा, गोल्डन डूरांटा, एकलीफा याचे छाट लावून रोपे तयार केली होती ती रोपे व्यवस्थित तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात कंपाउंडच्या साईडने ती सर्व रोपे लावून दिली 






Sunday, 22 October 2023

शेती व पशुपालन

जनावराच्या शरीराच्या मापावरून  अंदाजे वजन ठरवणे



कोणत्याही जनावराची वजन हे त्याच्या सुदृढ पणाचे मापक असते. आपल्या जनावराचे वजन त्याच्या वयाच्या योग्य प्रमाणात असेल तर ते चांगले उत्पादन देऊ शकते तसेच त्यांना त्यांच्या वजनानुसार आहार दिला जातो की नाही ते पाहता येते. जनावराची दूध देण्याची क्षमता काम करण्याची क्षमता हे त्याच्या वजनावर व आहारावर अवलंबून असते.
         ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव नववीच्या विद्यार्थ्यांनी ,
जनावराचे वजन काढण्यासाठी टेपच्या साह्याने जनावराच्या छातीचा घेर सेंटीमीटर मध्ये घेतला तसेच जनावराच्या दोन शिगांच्या मध्यापासून माकड हाडापर्यंतचे अंतर सेंटीमीटर मध्ये घेतल व जनावराचे अंदाजे वजन काढण्याच्या सूत्रामध्ये किमती टाकून जनावराच अंदाजे वजन काढले.


















Monday, 16 October 2023

शेती पशुपालन विभाग

    रान बांधणीच्या पद्धती व शेतात पीक घेणे


  ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी रान बांधणीच्या पद्धती शिकत असताना सपाट वाफा व सरी वरंबा बांधून घेतला. सपाट 2 वाफ्यामध्ये मेथी भाजी बियाणे टाकले. व एका वाफ्या मध्ये पालक भाजी बियाणे टाकले. तसेच सरी वरंब्यावर झेंडू , बिजली , शेवंती , मिरची ,टोमॅटो या रोपांची लागवड केली.















Friday, 22 September 2023

शेती व पशुपालन विभाग

             बीज प्रक्रिया

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी मेथी बियाण्यास बीज प्रक्रिया केली. *बीज प्रक्रिया म्हणजे* बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी आणि जोमदार रुपये येण्यासाठी बियाण्यांवर वेळोवेळी जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया केली जाते याला बीज प्रक्रिया म्हणतात. *बीज प्रक्रियेचे फायदे -* 1)बीज प्रक्रियेमुळे जमिनीतून व बियांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. 2)उगवण क्षमता वाढवता येते.3) रोपांची वाढ जोमाने होते .4)पिकाच्या उत्पादनात वाढ होते .5)रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते. 6)रोगप्रतिकारशक्ती वाढते.

बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती-1) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे (बोरीचे बी).2) बी थंड पाण्यात भिजत ठेवणे (ज्वारीचे बी) .3) कोरड्या बियांना औषध व जिवाणू संवर्धक चोळणे.4) रोपाची मुळे द्रावणात बुडवून ठेवणे .5)बी  कठीण पृष्ठभागावर घासणे (कोथिंबीर बी)

बीज प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशकांची नावे -थायरम, गंधक, मेटॅलेक्सल, कार्बेन्डेझीम, कॅप्टन. जिवाणू संवर्धन ची नावे अझोस्पिरिलियम ,अझोटोबॅक्‍टर, रायझोबियम ,स्फुरद विरघळविणारे जिवाणू

विद्यार्थ्यांनी हातात हात मोजे घालून अर्धा किलो मेथीचे बियाणे एका घमेल्यात घेतले त्यावर दोन ग्रॅम गुळाचे पाणी शिंपडले व त्यावर मेटलक्सल पावडर चोळले व बियाणे पेपर वर सावलीत सुकण्यासाठी ठेवून दिले. (गुळाच्या चिकटपणामुळे पावडर बियाण्याला चिकटून बसण्यास मदत होते)




Friday, 15 September 2023

शेती व पशुपालन विभाग

                       सेंद्रिय कीटकनाशक

               (दशपर्णी अर्क तयार करणे)

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव नववीच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय कीटकनाशक( दशपर्णी अर्क) तयार केला. त्यासाठी त्यांनी वीस लिटरच्या प्लास्टिक बॅरल मध्ये दहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये अडीचशे ग्रॅम कडुलिंब पाला, 100 ग्राम निरगुडी पाला, 100 ग्रॅम घाणेरीपाला, 100 ग्राम गुळवेल पाला, 100 ग्रॅम एरंडपाला, 100 ग्रॅम सीताफळ पाला ,100 ग्रॅम पपई पाला, 100 ग्रॅम रुई पाला ,100 ग्रॅम करंज पाला, 100 ग्रॅम कनेर पाला, घातला तसेच 100 ग्रॅम गाईचे ताजे शेन , 250 ग्रॅम गोमूत्र, प्लास्टिक बॅरल मध्ये टाकले व सर्व साहित्य बांबूच्या काठीने दररोज दोन ते तीन वेळा डावी कडून उजवीकडे ढवळले 30 दिवसानंतर विद्यार्थ्यांनी द्रावण गाळून घेतले.

पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोग व किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क हा रामबाण उपाय आहे.

पिकावर येणाऱ्या रोग व किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क तयार करणे रासायनिक घटकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने हे कीटकनाशक तयार केले जाते.

दशपर्णी अर्क वापरण्याची मात्रा- 2.5  लिटर द्रावण 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर क्षेत्रावर फवारावे.










Thursday, 24 August 2023

शेती पशुपालन विभाग

                गांडूळ खत निर्मिती

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगावच्या विद्यार्थ्यांनी 12 फूट लांब, चार फूट रुंद व तीन फूट उंचीच्या बेडमध्ये शाळेच्या परिसरातील पालापाचोळा जमा करून बेड मध्ये टाकला. एक थर पाला पाचोळ्याचा, एक थर शेणखताचा ,एक थर पालापाचोळा, एक थर शेणखत असे एक आड एक थर लावून गांडूळ खताचा बेड भरून घेतला व त्यामध्ये इसिनिया फेटिडा जातीचे गांडोळे सोडली .विद्यार्थ्यांनी बेडला दररोज पाणी सोडले. तो बेड पंधरा दिवसांनी विद्यार्थ्यांनी हलवून घेतला .खालचा थर वरती व वरचा थर खाली असं करून बेड मधील पालापाचोळा कुजण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतला.




Wednesday, 2 August 2023

गृह आरोग्य विभाग

                         शेंगदाणे चिक्की

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, शाळेतील इयत्ता नववीचे विद्यार्थ्यांनी शेंगदाणे चिक्की बनवली. 

      साहित्य-  शेंगदाणे चिक्की साठी लागणारे साहित्य गुळ तूप व शेंगदाणे

कृती:- 1) शेंगदाणे भाजून घेणे.

              2) भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून

                    घेणे.

             3) गॅस वर कढईमध्ये गुळाचा पाक करायला ठेवणे

              4) गुळाचा पाक तयार झाल्यावर त्यात     

                  शेंगदाण्याचा कूट टाकून कमी आचेवर एकजीव 

                करून घेणे.

             5) एकजीव झालेलं मिश्रण पोलपटावर काढून 

                   घेणे व ते चपाती सारखे लाटणे व चौकोन 

                   आकारात कट करणे थोडी थंड झाल्यावर 

                  त्याची पॅकिंग करणे.

पद्धत:- पाक पद्धतीने अन्नपदार्थ बनवणे.

काय शिकले:- पाक पद्धत शिकले, चिक्की हा टिकणारा पदार्थ आहे, शेंगदाणे गुळ हे पौष्टिक पदार्थ आहे, चिक्की ची कॉस्टिंग कशी काढावी, तिचे पॅकिंग करून शाळेत विद्यार्थ्यांनी विक्री केली.



     


Saturday, 29 July 2023

शेती व पशुपालन विभाग


                          माती परीक्षण

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण केले .पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व किती प्रमाणात कमतरता आहे हे पाहण्यासाठी म्हणजेच जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक असते .मातीच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत सामू, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र ,स्फुरद व पालाश यांचे परीक्षण केले जाते व जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे ती जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे की नाही हे माती परीक्षणातून कळते हे विद्यार्थ्यांनी अभ्यासले माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा. माती परीक्षण करताना कोणती काळजी घ्यावी. माती परीक्षणासाठीचा मातीचा नमुना कसा तयार करावा हे विद्यार्थी शिकले व विद्यार्थ्यांनी माती परीक्षण कीट  वापरून मातीचा सामू, सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण काढले.



Wednesday, 28 June 2023

शेती पशुपालन विभाग

                     रोपवाटिका तंत्रज्ञान

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव, मधील विद्यार्थ्यांनी रोपवाटिका म्हणजे काय हे विद्यार्थी शिकले. ज्या ठिकाणी झाडाझुडपाची, पिकांची कलमे यांची निगा राखली जाते याला मराठीत रोपवाटिका असे म्हणतात. रोपवाटिकेतून जातिवंत रोपांची कलमांची बियाण्यांची निर्मिती संगोपन व संवर्धन केले जाते. रोपवाटिकेचे प्रकार, रोपे तयार करण्याच्या पद्धती याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. तसेच अभिवृद्धी म्हणजे काय तर वनस्पतीची रोपे तयार करण्यासाठी मातृ वृक्षाचा भाग वापरून केलेल्या नव्या रोपाच्या निर्मितीस वनस्पतीची अभिवृद्धी असे म्हणतात. अभिवृद्धीचे दोन प्रकार पडतात 1)बियांपासून म्हणजेच अशाकीय अभिवृद्धी व 2) शाखीय अभिवृद्धी यामध्ये झाडाच्या अवयवाचा भाग वापरला जातो यामध्ये विद्यार्थी  कलमाचे वेगवेगळे प्रकार शिकले झाडाच्या पेन्सिल साइज फांदीचे ठराविक आकाराचे तुकडे करून त्यापासून फाटे कलम करतात विद्यार्थ्यांनी बोगनवेल, जास्वंद, अकेलीफा, गोल्डन डुरांटा या  झाडांचे फाटे वापरून पॉलिथिन बॅग मध्ये गांडूळ खत कोकोपीट व माती मिक्स करून पॉलिथिन बॅग भरल्या व त्यामध्ये हे झाडांचे फाटे लावून रोपे तयार करण्यास ठेवले