शेती विभागातील पाईपलाईन लिकेज काढले
हेक्सा फ्रेमच्या साह्याने पाईप कटिंग करून घेतला व सॉकेट वापरून व सोल्युशन वापरून पाईप जोडणी केली
धना व मेथी लागवड
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बेड मध्ये धना व मेथी चे बियाणे टाकले. व पंजाच्या साह्याने हलवून घेतले.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बेडमध्ये तयार झालेले गांडूळ खत चाळून घेतले.
ग्रो बॅग भरून रोपांची लागवड करणे
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माती कोकोपीट व गांडूळ खत मिक्स करून ग्रोबॅग भरून घेतल्या व त्या बॅग मध्ये झेंडू, वांगी ,मिरची, टोमॅटो ,फ्लावर या रोपांची लागवड केली व त्या रोपांना पाणी दिले
गांडूळ खत
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी 12 बाय चार फूट लांबी रुंदीचा गांडूळ खताचा बेड लावून घेतला व त्यामध्ये पालापाचोळ्याचा थर शेण खताचा थर अशी एका आड एक थर देऊन पाणी मारून त्यामध्ये गांडुळे सोडले
गांडूळ खताचे फायदे -
1) जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
2) पाणी देण्याचं कालावधी कमी होतो.
3) जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
4) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते .
5)जमिनीचा सामु योग्य प्रमाणात राखला जातो.
6) जमिनीची धूप कमी होते .
7)जमिनीचा पोत सुधारतो.
8) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
माती परीक्षण
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण केले. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व किती प्रमाणात कमतरता आहे हे पाहण्यासाठी म्हणजे सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते
मातीचा सामू, विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र ,स्फुरद व पालाश हे काढण्यासाठी माती परीक्षण केले जाते यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे की नाही हे समजते.जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजे ही माहिती माती परीक्षणावरून कळते.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण करून वनस्पतीतील वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा अभ्यास केला
1) वनस्पतीचे मुख्य अन्नद्रव्य - कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो .
2) वनस्पतीची दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम ,मॅग्नेशियम, गंधक या तीन अन्नद्रव्यांचा.
3) वनस्पतीची सूक्ष्म अन्नद्रव्य - जस्त,तांबे, मॅग्नीज, लोह, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन, निकेल या आठ अन्नद्रव्यांचा समावेश होतो