Monday, 19 December 2022

शेती व पशुपालन विभाग

                                                              धना व मेथी लागवड

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बेड मध्ये धना व मेथी चे बियाणे टाकले. व पंजाच्या साह्याने हलवून घेतले. 



                                                           गांडूळ खत

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बेडमध्ये तयार झालेले गांडूळ खत चाळून घेतले.





Wednesday, 30 November 2022

 गृह आरोग्य विभागातील ड्रेनेज लाईन तयार केली. व विद्यार्थ्यांना पाईप लाईन जोडण्याचे प्रकार शिकविले.






 घरातील स्विच बोर्ड तयार करणे व केसिंग पट्टी फिट करून वायरिंग करणे



Wednesday, 23 November 2022

शेती व पशुपालन विभाग

                                                                   ग्रो बॅग  भरून रोपांची लागवड करणे

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी  माती कोकोपीट व गांडूळ खत मिक्स करून ग्रोबॅग भरून घेतल्या व त्या बॅग मध्ये झेंडू, वांगी ,मिरची, टोमॅटो ,फ्लावर या रोपांची  लागवड केली व त्या रोपांना पाणी दिले




Wednesday, 26 October 2022

 गृह आरोग्य विभागात किचन2.5/8 टेबल तयार केला व त्याला विद्यार्थ्यांनी वेल्डिंग केली. व विद्यार्थ्यांना त्याला कलर दिला.





इन्व्हर्टर ची माहिती घेणे बॅटरी चे प्रकार शिकणे इन्व्हर्टरची जोडणी शिकणे इन्व्हर्टरची कॅपॅसिटी काढणे बॅटरीची देखभाल शिकणे
 

Sunday, 2 October 2022

शेती पशुपालन विभाग

 गांडूळ खत

  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी 12 बाय चार फूट लांबी रुंदीचा गांडूळ खताचा बेड लावून घेतला व त्यामध्ये पालापाचोळ्याचा थर शेण खताचा थर अशी एका आड एक थर देऊन पाणी मारून त्यामध्ये गांडुळे सोडले

 गांडूळ खताचे फायदे -  

1) जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. 

2) पाणी देण्याचं कालावधी कमी होतो. 

3) जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

 4) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते .

5)जमिनीचा सामु योग्य प्रमाणात राखला जातो.

6) जमिनीची धूप कमी होते .

7)जमिनीचा पोत सुधारतो.

8) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.






Wednesday, 28 September 2022

 विद्यार्थ्यांनी शाळेतील टेबल तयार केला 2/3 विद्यार्थ्यांनी सनमाइक चिटकविले




Wednesday, 21 September 2022

शेती पशुपालन विभाग

 माती परीक्षण

 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण केले. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व किती प्रमाणात कमतरता आहे हे पाहण्यासाठी म्हणजे सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते

 मातीचा सामू, विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र ,स्फुरद व पालाश हे काढण्यासाठी माती परीक्षण केले जाते यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे की नाही हे समजते.जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजे ही माहिती माती परीक्षणावरून कळते.

 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण करून वनस्पतीतील वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा अभ्यास केला

 1) वनस्पतीचे मुख्य अन्नद्रव्य - कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो .    

 2) वनस्पतीची दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम ,मॅग्नेशियम, गंधक या तीन अन्नद्रव्यांचा. 

  3) वनस्पतीची सूक्ष्म अन्नद्रव्य - जस्त,तांबे, मॅग्नीज, लोह, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन, निकेल या आठ अन्नद्रव्यांचा समावेश होतो




Wednesday, 31 August 2022

 विद्यार्थ्यांनी सेफ्टी प्रिकॉशनचा  वापर करून शाळेतील बेंच वेल्डिंग केले व विद्यार्थी वेल्डिंग
करण्यास शिकले ‌

Sunday, 7 August 2022

शेती पशुपालन विभाग

 दशपर्णी अर्क

 इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय कीटकनाशक म्हणजेच दशपर्णी अर्क तयार केला पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोग  किडींसाठी उपाय म्हणून दशपर्णी अर्क तयार केला

 दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 250 ग्रॅम कडुलिंब पाला , 100 ग्रॅम निरगुडी पाला , 100 ग्रॅम घाणेरीपाला , 100 ग्रॅम गुळवेल पाला , 100 ग्रॅम एरंडपाला , 100 ग्रॅम सीताफळ पाला , 100 ग्रॅम पपई पाला , 100 ग्रॅम रुई पाला , 100 ग्रॅम करंज पाला , 100 ग्रॅम कन्हेर पाला , 100 ग्रॅम गाईचे शेण , 250 ग्रॅम गोमूत्र  हे साहित्य घेऊन वीस लिटरच्या बॅरल मध्ये दहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये टाकले व बांबूच्या काठीने दररोज दोन ते तीन वेळा डावीकडून उजवीकडे एक महिना ढवळले .30 दिवसानंतर हे द्रावण पूर्णता आंबल्यावर गाळून घ्यावे.

अडीच लिटर दशपर्णी अर्क 200 लिटर पाण्यात मिक्स करून प्रति एकर क्षेत्रावर फवारावे

पिकावर येणाऱ्या रोग व  किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क हा रामबाण उपाय आहे.






Wednesday, 27 July 2022


 लोखंडी फ्रेमला वेल्डिंग करताना विद्यार्थी




वेगवेगळ्या प्रकारचे वायरिंग व त्यांच्या सर्किट शिकणे त्याचप्रमाणे हाउस वायरिंग शिकणे व त्यातील फॉल्ट काढणे