Sunday, 2 October 2022

शेती पशुपालन विभाग

 गांडूळ खत

  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गांडूळ खत तयार करण्यासाठी 12 बाय चार फूट लांबी रुंदीचा गांडूळ खताचा बेड लावून घेतला व त्यामध्ये पालापाचोळ्याचा थर शेण खताचा थर अशी एका आड एक थर देऊन पाणी मारून त्यामध्ये गांडुळे सोडले

 गांडूळ खताचे फायदे -  

1) जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. 

2) पाणी देण्याचं कालावधी कमी होतो. 

3) जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.

 4) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते .

5)जमिनीचा सामु योग्य प्रमाणात राखला जातो.

6) जमिनीची धूप कमी होते .

7)जमिनीचा पोत सुधारतो.

8) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.






Wednesday, 28 September 2022

 विद्यार्थ्यांनी शाळेतील टेबल तयार केला 2/3 विद्यार्थ्यांनी सनमाइक चिटकविले




Wednesday, 21 September 2022

शेती पशुपालन विभाग

 माती परीक्षण

 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण केले. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व किती प्रमाणात कमतरता आहे हे पाहण्यासाठी म्हणजे सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते

 मातीचा सामू, विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र ,स्फुरद व पालाश हे काढण्यासाठी माती परीक्षण केले जाते यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे की नाही हे समजते.जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजे ही माहिती माती परीक्षणावरून कळते.

 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण करून वनस्पतीतील वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा अभ्यास केला

 1) वनस्पतीचे मुख्य अन्नद्रव्य - कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो .    

 2) वनस्पतीची दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम ,मॅग्नेशियम, गंधक या तीन अन्नद्रव्यांचा. 

  3) वनस्पतीची सूक्ष्म अन्नद्रव्य - जस्त,तांबे, मॅग्नीज, लोह, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरीन, निकेल या आठ अन्नद्रव्यांचा समावेश होतो




Wednesday, 31 August 2022

 विद्यार्थ्यांनी सेफ्टी प्रिकॉशनचा  वापर करून शाळेतील बेंच वेल्डिंग केले व विद्यार्थी वेल्डिंग
करण्यास शिकले ‌

Sunday, 7 August 2022

शेती पशुपालन विभाग

 दशपर्णी अर्क

 इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय कीटकनाशक म्हणजेच दशपर्णी अर्क तयार केला पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या रोग  किडींसाठी उपाय म्हणून दशपर्णी अर्क तयार केला

 दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 250 ग्रॅम कडुलिंब पाला , 100 ग्रॅम निरगुडी पाला , 100 ग्रॅम घाणेरीपाला , 100 ग्रॅम गुळवेल पाला , 100 ग्रॅम एरंडपाला , 100 ग्रॅम सीताफळ पाला , 100 ग्रॅम पपई पाला , 100 ग्रॅम रुई पाला , 100 ग्रॅम करंज पाला , 100 ग्रॅम कन्हेर पाला , 100 ग्रॅम गाईचे शेण , 250 ग्रॅम गोमूत्र  हे साहित्य घेऊन वीस लिटरच्या बॅरल मध्ये दहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये टाकले व बांबूच्या काठीने दररोज दोन ते तीन वेळा डावीकडून उजवीकडे एक महिना ढवळले .30 दिवसानंतर हे द्रावण पूर्णता आंबल्यावर गाळून घ्यावे.

अडीच लिटर दशपर्णी अर्क 200 लिटर पाण्यात मिक्स करून प्रति एकर क्षेत्रावर फवारावे

पिकावर येणाऱ्या रोग व  किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क हा रामबाण उपाय आहे.






Wednesday, 27 July 2022


 लोखंडी फ्रेमला वेल्डिंग करताना विद्यार्थी




वेगवेगळ्या प्रकारचे वायरिंग व त्यांच्या सर्किट शिकणे त्याचप्रमाणे हाउस वायरिंग शिकणे व त्यातील फॉल्ट काढणे


Monday, 11 July 2022

                                                 शेती व पशुपालन विभाग

       ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे,इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मेथी बियाण्यास Metalaxyl chi बीजप्रक्रिया केली.

      बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यांतून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आणि जोमदार रोप येण्यासाठी बियाण्यांवर वेळोवेळी जैविक व रासायनिक कीटकनाशकांची व संवर्धकांची प्रक्रिया केली जाते.याला बीज प्रक्रिया म्हणतात.

  बीज प्रक्रियेचे फायदे-  

1)बीज प्रक्रियेमुळे बियांची उगवण क्षमता वाढवता येते. 

2)उत्पादनात वाढ होते.

3) रोपे मारण्याचे प्रमाण कमी होते.

4) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते .

5)रोपे निरोगी व जोमदार वाढतात .

6)बीज प्रक्रियेमुळे जमिनीतून व बियांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.





Wednesday, 29 June 2022

 विद्यार्थ्यांना विभागाची ओळख करून साहित्य साधने त्यांचा वापर व सुरक्षिततेचे नियम शिकवले



 


ऊर्जा पर्यावरण विभागाची ओळख साहित्य साधनांची ओळख व सुरक्षिततेचे नियम त्याचप्रमाणे हत्यारांचा वापर शिकणे







Tuesday, 21 June 2022

                                                              शेती व पशुपालन विभाग 

     ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव येथे ,आय बी टी विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शेती व पशुपालन विभागातील साहित्य साधनांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. त्या साहित्य साधनांचा उपयोग काय होतो ते साहित्य हाताळताना काय काळजी घ्यायची याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.








Saturday, 3 November 2018

Students made a ‘A’ frame to mark a contour line

 In Energy and environment section along with electrical introduction students also introduces to the environment activities. Under the theme of water conservation there is an activity to draw a contour line using A frame.
In this activity students introduced to the use of A frame method and process to make a ‘A’ frame from wooden plank. In this process students made a ‘A’ Frame of 1 meter size and tried to use the same. The 10th std. students participated in this activity.


Friday, 2 November 2018

Students repaired 15 benches using engineering tools




Since this was a start of education year school had a requirement of various repairing works specially related to the benches. The IBT students made a survey of all the benches in the schools and they found that 15 benches need a repairing.
The 9th and 10th std students had introduced the process of using various engineering tools so they took initiative in this repairing work.
In this activity students repaired total 15 benches. In this they fixed plank for some benches using drilling and screw fitting and used welding machine, cutter,
grinder, files, measuring and marking tools, etc. For this service they received Rs. 750 as a labor charges.