Tuesday, 2 January 2018

उर्जा व पर्यावरण विभाग

उर्जा व पर्यावरण विभाग


इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी दोन टू वे स्वीचचा वापर करून जिना वायरिंग केले. 

एकवन वे स्वीच व तीन टू वे स्वीचचा वापर करून गोडाऊन वायरिंग केले.जिना वरिंग व गोडाऊन वायरिंगसाठी होल्डर व बल्ब चा वापर केला. 

विद्यार्थ्यांना सोल्डरिंग गण व सोल्डरिंग मेटलचा चा वापर करून सोल्डरिंग कसे करावे हे शिकवले छोटे-छोटे सर्किट्स सोल्डर तयार केले. बँटरी व इन्व्हर्टर ची माहिती दिली. 




इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रोनिक सर्किटची माहिती दिली. वेगवेगळे काम्पोनंटची माहिती व ते सर्किटमध्ये कसे वापरावेत याची माहिती दिली.
 P.C.B.विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी L.D.R. वापरून सर्कीट तयार केले त्यामध्ये 555 IC वापरला. PCB वर चेक करून बल्ब चालू/बंद केला. उजेडात बल्ब बंद होतो व अंधारात चलू होते हे पाहिले.


 



 


Monday, 1 January 2018

शेती व पशुपालन विभाग

जनावारांसाठी अॅझोला पद्धतीने चारा तयार करणे -  

 जनावरांना चारा तयार करण्याच्या पध्दती पैकी  ibt शेती व पशुपालन विभागाणे  अझोला तयार केला . त्यासाठी 3मीटर *१.५ मीटर लांबी रुंदीचा बेड खणला.व ३० सेंमी खोली ठेवली . बेड मध्ये 3*3 मीटरची ताडपत्री टाकून  ५ किलो शेणगारा करून घमेल्यात नळीने पाणी  सोडले .   ५किलो वडाच्या झाडाखालची माती ५० gram ssp व ५० gram मिनरल powder  टाकली व पूर्ण बेड पाण्याने भरून घेतला . व त्यात १/२ किलो अझोला टाकले . व १२ दिवसानंतर बेड मधून १किलो अझोला काढून विक्री केली.

अझोलाचे फायदे- 
१)दुधाची प्रत व उत्पादन वाढते 
2)उत्पादनास सोपे व स्वस्त 
3)कोरड्या वजनानुसार अझोलात २५-३०% प्रथिने  १०-१२% खनिजे व ७-१०%अमिनो asid असतात 
४)शेळी मेंढी गाय म्हेस ससा माशे कोंबड्या खाद्य म्हणून उपयोगी 
5)१५-२०% आबवनवरचा खर्च कमी होतो 

Tuesday, 19 December 2017

Smart Girl प्रशिक्षण



Smart Girl  प्रशिक्षण









दिनांक १२/१२/२०१७  शाळेमध्ये युवती सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वी च्या  मुलीना Smart Girl प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्दिष्टे मुलींमधील आत्मजीवन  वृद्धिंगत करणे, नातेसंबंधाना जपण्याबाबत मानसिक तयारी करणे, आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाबाबत जागरुकता निर्माण करणे, धोकादायक प्रलोभानाची जाणीव ठेवून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे. इ. वर मुलीना माहिती देण्यात आली.
मुलींसाठी त्यांच्या भावनिक सबलीकरणासाठी आणि त्यांच्या सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी   ‘ Smart Girl ’ प्रशिक्षण घेण्यात आले.
 

आय.बी.टी. स्क्रॅप रॅली

आय.बी.टी. स्क्रॅप रॅली




नालंदा फौंडेशन आणि विज्ञान आश्रम पाबळ यांच्या सहकार्याने ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव या शाळेत आय.बी.टी. हा व्यावसायिक अभ्यासक्रम सन २०१६ पासून सुरु आहे. आय.बी.टी. अंतर्गत स्क्रॅप रॅली हा उपक्रम शनिवार दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी विद्यालयाने आयोजित केला होता. परिसरातून प्रभात फेरी काढून लोकांना आवाहन केले व परिसरातील लोकांनी घरातील टाकाऊ वस्तू उत्फूर्तपणे विद्यार्थ्यांना दिल्या. त्यात प्लास्टिक बॉटल, ड्रम, फॅन, तेल डबे, इ. सत्तर ते ऐंशी किलो साहित्य जमा केले.
विद्यार्थी या टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणार असून त्यातून नव निर्मितीचा आनंद घेणार आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होणार आहे. या उपक्रमाचे कौतुक शंभूवंश प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सत्कार करून केले.